मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबाद । औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील मुबईहून … Read more

६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन, म्हणून दिवे लावायचं आवाहन केलं का?- कुमारस्वामी

वृत्तसंस्था । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या कल्पनेवर समाजवादी जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शंका उपस्थित केली आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून काही प्रश्नही मोदींना विचारले आहेत. ”पंतप्रधानांनी धूर्तपणे देशाला भाजपाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं आहे का? ६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यामुळे … Read more

लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळं सर्वजण घरात आहेत. अशावेळी वेळ आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटक खोटी भ्रामक माहिती, फेक मॅसेज व्हायरल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारा तपशील सोशल मीडियावर फॉरवर्ड करणे असे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने … Read more

ध्यानात घ्या! दिवे लावताना काय करायचं? आणि काय नाही?

पुणे । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांना त्यांची ९ मिनटं मागितली होती. येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी … Read more

सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..

वृत्तसंथा । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांकडे ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री … Read more

पुण्याचे टेन्शन वाढलं! करोना रुग्णांची संख्या १०० पार

पुणे प्रतिनिधी । मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यात पुणे शहरात १७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णामुळं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे पिंपरी -चिंचवडमध्ये करोनाग्रस्तांचा आकडा आता १०३ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत पुण्यात … Read more

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ससूनमध्येच एका ४८ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल प्रशासनानं ही माहिती दिली. कोरोना … Read more

हुश्श.. सुटली बया एकदाची! कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। करोनाची लागण झालेली गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आज तिचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र कनिकाला अजूनही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही. कनिकाची … Read more

माध्यमातल्या खोट्या बातम्यांकडे भारतीय मुस्लिम आणि सुजाण नागरिकांनी कसं पहावं?

मीडियातली लोकं नेहमीप्रमाणे मुसलमानांना विकृत भावनेनं बघण्याचे धडे जगाला देत होती. परंतु त्याच दिवशी टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी फेक असल्याचं जाहीर केलं. मूऴ व्हिडिओ मुंबई मिररनं काढला होता. काही वर्षांपूर्वीचा तो व्हिडियो होता.

Breaking | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार; २४ तासात ५२५ रुग्णांची भर

नवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे. या नवीन ५२५ रुग्णानंतर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३७२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात ७५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर त्यानंतर … Read more