धक्कादायक! ‘होम क्वारंटाईन’मधून पुजारी अंबाबाई मंदिरात; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लंडनहून परतल्यानंतर होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश असतानाही अंबाबाई मंदिरात पुजेसाठी आलेल्या पुजाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश असताना संबधित पुजारी बुधवारी सकाळी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात पुजेच्या साहित्यासह आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत ही कारवाई केली. संबधित … Read more

राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२२ वर; अशी आहे जिल्हावार करोनाबाधीत रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची ११६ वरून १२२ झाली आहे. आज दिवसभरात १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे ४ जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आता मुंबईत नव्याने ५ आणि … Read more

पाकिस्तानला करोनाची मगरमिठी; करोनाबाधितांची संख्या १ हजारावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाला करोना व्हायरस गुडघे टेकायला लावत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानात सुद्धा करोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजारवर पोहोचली आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानला करोना व्हायरसची मगरमिठी बळकट होताना दिसत असून चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणे पाकिस्तानात अजूनही पूर्णपणे लॉकडाउन करण्यात … Read more

संचारबंदीत घरात बसून संजय राऊत करतायत तरी काय? पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशासह संपूर्ण राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण विरंगुळा म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा घरात बसून संचारबंदीचे पालन करत आहेत. मात्र, एरवी आपल्या आपल्या लेखणीतून किंवा शब्द बाणातून विरोधकांना गबगार करणारे राऊत सध्या … Read more

आता क्वारंटाइन असलेल्यांच्या बोटाला लागणार शाई, निवडणुक आयोगाची संमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर सुरू आहे. यामुळे, आज निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाचा आढावा घेतला असून आरोग्य अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींच्या बोटाला मतदानादरम्यान वापरण्यात येणारी शाई लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूची ५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील चार इंडोनेशियन नागरिक आणि त्यांचा चेन्नई येथील गाईड यांची सलेम … Read more

धक्कादायक! ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना याचा फटका ब्रिटनच्या राजघराणाऱ्याला सुद्धा बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्यात करोनाची सौम्य लक्षण आढळून आली आहेत. प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं त्यांनी आता स्वतःला कोरंटाईन करून घेतलं आहे. यासोबतच प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी कॅमीला पार्कर यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगची झलक, अमित शाह म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर … Read more

त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे … Read more

इटलीमध्ये कोरोनामुळे एका दिवसात ७४३ लोकांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रोम मंगळवारी इटलीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे ७४३ लोकांचा मृत्यू झाला. यासह दोन दिवसांपासून मृतांची संख्या वाढल्याने या साथीच्या रोगावर मात करण्याच्या आशेलाही मोठा धक्का बसला आहे.इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यापासून आज (मंगळवार) दुसरा असा दिवस आहे इजथे एवढ्या मृत्यूंची नोंद झाली आहे, परंतु नागरी संरक्षण एजन्सीने म्हटले आहे की सोमवारी आलेल्या नवीन घटनांच्या … Read more

मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरूच; पोलिसांच्या धाडीत ४ लाख मास्क जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी काळाबाजार सुरु असून पोलिसांनी मास्कचा मोठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी अंधेरीत विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत ४ लाख मास्क जप्त केले आहेत. या साठ्याची एकूण किंमत जवळपास १ कोटी रूपये सांगितली जात आहे. माक्सचा अवैधरित्या साठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Maharashtra: Mumbai Police … Read more