त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे येथील एका ४० वर्षीय व्यक्तीने आपण कोविड -१९ ने ग्रसित आहोत असा खोटा दावा केला.त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.ठाणे शहर पोलिसांनी ही माहिती दिली.

कासारवादावली पोलिस ठाण्याचे सीनयिर इंस्पेक्टर किशोर खैरनार यांनी सांगितले की, ठाण्यात राहणाऱ्या या व्यक्तीविरूद्ध मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (सार्वजनिक त्रास) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने एका व्हाट्सएप ग्रुपवर एक संदेश पोस्ट केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि त्याची प्रकृती आणखी खराब होईपर्यंत त्याला रूग्णालयात दाखल व्हावेसे वाटत नाहीये. ही माहिती अधिकाऱ्यानी दिली.

त्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांच्या निदर्शनास येताच वैद्यकीय पथकाने त्या व्यक्तीच्या घरी तपासणी केली असता तो माणूस खोटे बोलला असल्याचे आढळून आले. तथापि,या प्रकरणात अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.सोशल मीडियावर कोरोना विषाणूबद्दल चुकीची माहिती पसरविणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्याविरूद्ध पोलिस अधिकारी कठोर कारवाई करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूची सुमारे ११२ पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये ही आकडेवारी ५६० च्या वर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment