कडक उन्हाळा आपल्याला कोरोनापासून वाचवेल असं समजत असाल तर ‘हे’ वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासात ८०९ प्रकरणे नोंदली गेली आणि ४६ लोक मरण पावले आहेत. कोविड १९ विषयी सांगायचे झाले तर येणाऱ्या हंगामात उन्हामुळे संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित संस्थेने उच्च तापमानामुळे कोरोनावर काहीही परिणाम होणार … Read more

लॉकडाउन नसता तर देशात हाहा:कार माजला असता! अहवालातून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. हा लॉकडाउन जर लागू केला नसता तर भारतात कोरोनाने हाहाकार माजला असता असं निरीक्षण आयसीएमआर (Indian Council of Medical Research ) या संस्थेनं आपल्या एका निरीक्षणात म्हटलं आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय फायद्याचं ठरलं असल्याचे सांगितलं आहे. … Read more

पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या संख्यने स्थिती चिंताजनक

पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे … Read more

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; जाणून घ्या आजची स्थिती

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एका दिवसात २२९ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली होती. मात्र आज १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. … Read more

हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे … Read more

लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात … Read more

मुंबईतली कोरोना रुग्ण संख्या झाली ७७५; आज ९ जणांचा बळी

मुंबई । मुंबई सध्या कोरोनाच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग मुंबईची चिंता आणखी वाढवत आहे. आज मुंबईत कोरोनाचे ७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७७५ झाली आहे. तर आज एकाच दिवसात मुंबईत करोनाची लागण झाल्याने ९ जणांचा बळी गेला आहे. एकूण ६५ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य … Read more

राज्यात करोनाबाबत अफवा, फेक न्यूज पसवणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई । संपूर्ण देशात करोनान थैमान घातलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईलाजानं लॉकडाउनच कठोर पाऊल सरकारला उचलावं लागलं. ज्यामुळं संपूर्ण देश ठप्प झाला. लोक घरात बंद झाली. तर दुसरीकडे करोना दिवसेंदिवस आपले पाय पसरत चालला आहे. देश अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरा जातो आहे. अशा सगळ्या वातावरणात हेट स्पीच, अफवा पसरवणे,खोट्या बातम्या पसरवण्याचे दुर्दैवी प्रकार घडत … Read more

न्यूझीलंड कोरोनाविरुद्ध कसा लढतोय? आत्तापर्यंत केवळ १ मृत्यू, बाकी रुग्ण ठणठणीत बरे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरामध्ये विनाशकारी कोरोना विषाणूमुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हाहाकार माजवला आहे.मात्र न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत केवळ ०१ मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना प्रकरणात सातत्याने घट होत आहे. हा देश काय करीत आहे हे संपूर्ण जगाने शिकले पाहिजे जेणेकरुन कोरोनाचा शिरकाव तिथे थांबला आहे. या गुरुवारी तेथे २९ नवीन कोरोना प्रकरणे … Read more

कोल्हापूरात लॉकडाउनमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या 100 जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्यावतीने संचारबंदी लागू केली असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कोल्हापूर शहरातील 100 जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संचारबंदी काळात घराबाहेर पडणारे उच्चभ्रू लोक असून त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडल्या नंतर खोटी माहिती दिल्याचं देखील उघड झालंय.खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर , वकील … Read more