भारतात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरवात? तज्ञांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतात समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तज्ञांनी सरकारच्या अडथळ्यामुळे न स्वीकारले … Read more

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता. तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा … Read more

चीनची राजधानी बिजिंगमध्ये पुन्हा संपुर्ण लाॅकडाउन जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.  कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ … Read more

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more

म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more

मान्सूनसोबत कोरोनाचा धोकाही वाढणार? जाणुन घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाने संक्रमित रूग्णांची संख्या ही ३ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. हवामान तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जवळजवळ संपूर्ण देशात मान्सून आला आहे. केरळमध्ये मान्सूनने जोरदार धडक मारली असून आता … Read more

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर … Read more

संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण बनली आहे. त्याबरोबर राज्यातील अफवाचे पीक देखील एक गंभीर विषय बनला आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री गरज पडली तर पुन्हा संचारबंदी जाहीर करावी लागेल असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा विपर्यास करीत काहींनी पुन्हा संचारबंदीच्या अफवा पसरवल्या आहेत.  याबद्दल खुलासा करत अद्याप पुन्हा संचारबंदी जाहीर केलेली नाही असे … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे| जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये 90 वर्षीय वृद्ध महिलेसह सहा जणांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील लादेवाडी मध्ये 41 वर्षीय पुरुष तर रिळेमध्ये 41 वर्षांची महिला, … Read more

राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे. एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच … Read more