चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था । देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात … Read more

Breaking| आज महाराष्ट्रात कोरोनाचे ४७ नवे रूग्ण, त्यातील ४३ मुंबई-ठाण्यात

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, आज ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात करोनाचे एकूण ४७ नवे रूग्ण आढळले आहेत. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, २ पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे. अशी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या नवीन रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. … Read more

सिंगापूरातही वाढतायत कोरोनाची प्रकरणे, पंतप्रधानांकडून १ महिन्याच्या बंदची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी तेथील सरकारने एक महिन्यासाठी देशात संपूर्ण बंदची घोषणा केली आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महिनाभर बंदी घालण्याची घोषणा केली. सिंगापूरमध्ये कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या १,११४ वर पोहोचली आहे, तर पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापूर्वी सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले … Read more

गेल्या २४ तासात ८ हजार करोना टेस्ट; महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झाली इतकी..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण ८ हजार चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एका दिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. भारतात २३०१ जणांचा … Read more

कोविड -१९ च्या लसीची उंदीरांवर यशस्वी चाचणी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संशोधकांनी कोविड -१९ साठी उंदीरांवर संभाव्य लसीची चाचणी केली आहे आणि उंदीरांमध्ये कोरोना विषाणूची प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, तितकेच लस व्हायरसच्या प्रभावांना निष्फळ करण्यासाठी दिली जावी. अभ्यासात असे दिसून आले आहे की जेव्हा उंदरांमध्ये पिट्सबर्ग कोरोना व्हायरस (पिटकोव्हॅक) ही लस चाचणी केली गेली तेव्हा त्यास सारस सीओव्ही -२ या कोरोना विषाणूविरूद्ध … Read more

बांग्लादेशातील निर्वासित छावण्यांमधील रोहिंग्या मुस्लिम कोरोनाच्या दहशतीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठ्या शरणार्थी शिबिरांपैकी बांगलादेशातील कॉक्स बाझारमध्ये राहणारे रोहिंग्या मुस्लीम कोरोना विषाणूच्या दहशतीखाली जगत आहेत.इथे छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये अनेक लोक राहतात, याचा अर्थ असा की जर हा संसर्ग इथे पसरला तर तो थांबविणे फारच कठीण जाईल. प्रति चौरस किलोमीटरच्या चौरस झोपड्यांमध्ये सुमारे ४,००० लोक राहतात आणि लोकसंख्येची ही घनता बांगलादेशच्या … Read more

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी … Read more

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने हैदोस घातला आहे. असं असतानाही जीवमुठीत घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ड्युटीवर असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार … Read more

कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता सौदी अरेबियाच्या मक्का,मदिना येथे २४ तासांचा कर्फ्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौदी अरेबियाने मक्का आणि मदिना येथे २४ तासांचा कर्फ्यू लावला आहे. प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले. समाचार एजेंसी सिन्हुआने गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, “प्रवेश आणि बाहेर जाण्यासंबंधीचे निर्बंध कायम ठेवून दोन्ही शहरांच्या सर्व भागात कर्फ्यू लागू होईल.” प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या निर्बंधामध्ये सरकारी … Read more

मोदींच्या आवाहनानंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस; हसून-हसून तुमचंही दुखायला लागेल पोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटाला घरातील वीज बंद करून दिवे, मेणबत्ती जाळून … Read more