जगात हे १५ देश आहेत कोरोना व्हायरस फ्री..

वृत्तसंस्था । संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचे हे जीवघेणं लोण चीनच्या वुहान प्रांतांमधून संपूर्ण जगात पसरलं. काय अमेरिका, काय ब्रिटन अशा बलाढ्य देशांना कोरोनाने जबरदस्त तडाखा दिला. इटली, स्पेन, फ्रांस हे युरोपातील देश कोरोनाच्या संकटात कोसळले. युरोपात सर्वात जास्त जीवितहानी याच देशात झाली आहे. आतापर्यंत जगभरात २० लाखहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. … Read more

कोण होता कोरोनाचा पहिला रुग्ण, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरातील १९लाखाहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेतच ५ लाखाहून अधिक लोक संसर्गित आहेत. त्याच वेळी, चीनमधून हा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली येथे ८२,२४९ लोक या विषाणूला बळी पडले आहेत.हे संक्रमण चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सुरू झाले. असे म्हणतात … Read more

लज्जास्पद! कोरोना संशयिताची चाचणी घ्यायला गेलेल्या मेडिकल टीम व पोलिसांवर दगडफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात काहीजणांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. वैद्यकीय पथक आणि पोलिस त्या भागात कोरोना संशयिताचा शोध घेण्यासाठी गेले होते. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने सांगितले की, “जेव्हा आमची टीम रूग्णांसह रुग्णवाहिकेत चढली तेव्हा अचानक जमावाने गर्दी केली आणि दगडफेक सुरू केली. काही … Read more

धक्कादायक! लाॅकडाउनमुळे घरी जाता न आल्याने मजूराची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये एका प्रवासी मजुराने नुकतीच आत्महत्या केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो घरी परत येऊ शकला नाही म्हणून तो माणूस खूपच नाखूष होता. हैदराबादच्या अप्प्पल भागात या २४ वर्षांच्या मजुराने आत्महत्या केली. पोलिसांकडे अशी माहिती मिळाली की त्याच्या सोबत राहणारी व्यक्ती १३ मार्च रोजी बिहारला रवाना … Read more

तबलिगी जमातच्या मौलाना सादसह इतर तबलिगींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली । तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलत तबलिगींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अंतर्गत हेतुपुरस्सर नसलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह १ हजार ८९० जणांवर हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये … Read more

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरातील १९ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्या वाढून १० हजारांच्या पुढे गेली आहे. चीन येथून हा घातक कोरोना विषाणू कसा पसरला याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही … Read more

मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

लॉकडाऊनमुळे आयपीएल अनिश्चीत काळासाठी लांबणीवर

मुंबई । देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली होती. केंद्र सरकार लॉकडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतंय हे पाहून स्पर्धा कधी खेळवली जाईल याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकाडउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यामुळे … Read more

पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले म्हणाले,”म्हणजे पंतप्रधानांना काही माहितच नाही.”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराबाबत होणाऱ्या दुर्लक्षाची दखल घेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वातील फेडरल सरकार आणि प्रांतीय सरकारांवर जोरदार हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. ‘जिओ उर्दू’ च्या अहवालानुसार, खंडपीठाने न्यायालयात सरकारची … Read more

संयुक्त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी कोरोनाव्हायरसने संक्रमित,तर तीन जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संयुक्त राष्ट्रसंघही सुटू शकलेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत, कोविड -१९ च्या संक्रमणाने संयुक्‍त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी बाधीत झाले आणि संपूर्ण यूएन सिस्टममध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले, “साथीला सुरूवात झाल्यापासून ते रविवारी … Read more