जगात हे १५ देश आहेत कोरोना व्हायरस फ्री..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचे हे जीवघेणं लोण चीनच्या वुहान प्रांतांमधून संपूर्ण जगात पसरलं. काय अमेरिका, काय ब्रिटन अशा बलाढ्य देशांना कोरोनाने जबरदस्त तडाखा दिला. इटली, स्पेन, फ्रांस हे युरोपातील देश कोरोनाच्या संकटात कोसळले. युरोपात सर्वात जास्त जीवितहानी याच देशात झाली आहे. आतापर्यंत जगभरात २० लाखहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर सव्वा लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांकडून उपाययोजना सुरु आहेत. आतापर्यंत जगातील २१० देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, जगात १५ असे  देश आहेत, त्याठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.  असे १५ देश आहेत, त्या देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यामध्ये कोमोरोस, किरिबाती, लेसोथो, मार्शल आइलँड्स, मायक्रोनेशिया, नॉरू, नॉर्थ कोरिया, पलाऊ, समोआ, सोलोमन आयलँड्स, ताझिकिस्तान, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालु आणि वानुअतु या देशांचा समावेश आहे.

या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव न होण्यामागे सर्वांत पहिले कारण म्हणजे, येथील लोकसंख्या कमी आहे. या १५ देशांमध्ये अधिक करून लहान लहान बेटे आहेत. ती जास्त प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही नियमाशिवाय सोशल डिस्टेंसिंग होत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

 

Leave a Comment