देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ९१५२ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड -१९ चे ७९८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९१५२ संसर्ग झालेल्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५६ जण ठीक अथवा डिस्चार्ज करण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये … Read more

महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणारं राज्य- राजेश टोपे

मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि … Read more

पेटीएमने पीएम-केअर फंडसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जमा केले १०० कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने कोविड -१९ संकट दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी साठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. पेटीएमने यापूर्वी जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात १०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रत्येक योगदान किंवा वॉलेट … Read more

नोव्हेंबरमध्येच अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीने ‘कोरोना कुंडली’ शोधली होती,मग सुपर पॉवर चुकली कुठे?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरससंदर्भात वेगवेगळे खुलासे चालू आहेत. आता अमेरिकेच्या या माजी लष्करी अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरूवातीस चीनमधील या विषाणूची माहिती मिळाली होती आणि ते या विषाणूवर निरंतर लक्ष ठेवून होते. सीएनएनच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एकत्रित झालेल्या गुप्त माहितीच्या पहिल्या अहवालाची नेमकी तारीख … Read more

जगभरात १७ लाख जणांना कोरोनाची लागण तर १ लाख जणांचा बळी, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाचे संक्रमण सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे एक लाख तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १० लाख पाच हजारांहून अधिक लोक संक्रमित असून तीन लाख ७८ हजार लोक बरे झाले आहेत. अमेरिकेची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेत … Read more

कोरोनाचा सामना करण्याच्या नावाखाली आता चीन करतोय आफ्रिकन लोकांना लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण चीनमधील सर्वात मोठे शहर ग्वांगझूमधील आफ्रिकन नागरिकांचे म्हणणे आहे की परदेशातून कोरोना विषाणूची वाढती घटना रोखण्यासाठी देशातील तीव्र कारवाई करून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले की त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले गेले होते, तेव्हा त्यांना सक्तीने घरातून काढून टाकले जात होते, मनमानी करून बाजूला ठेवले गेले आणि … Read more

राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६६६ वर

मुंबई । राज्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळं दिवसेंदिवस कोरोबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. करोनामुळे भारतात … Read more

लॉकडाऊन काळात अफवांचा बाजार तेजीत; ३९ आरोपींना अटक

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनामुळं राज्यातील दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चहाला आहे. लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि संचारबंदीचे कडक होत चालले नियम यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोकांच्या याच संभ्रमाचा फायदा घेत काही समाजकंटक अफवा, खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. … Read more

कोरोनाव्हायरससाठी शास्त्रज्ञांनी सहा संभाव्य औषधे शोधली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शास्त्रज्ञांनी दहा हजाराहून अधिक संयुगांमधून अशी सहा औषधे शोधली आहेत जी कोरोना विषाणूचा उपचार करण्यास मदत करू शकतात. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार क्लिनिकल ट्रायल्स आणि इतर संयुगांमध्ये या ओळखल्या जाणार्‍या औषधांच्या प्रभावांचे परीक्षण केले जाते. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ल्यूक गुड्डाट म्हणाले, “सध्या कोरोना विषाणूचा कोणताही वैद्यकीय सराव किंवा उपचारांचा … Read more

पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण ४६०१ पर्यंत वाढले आणि मृतांचा आकडा ६६ वर पोचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने वाढून ४६०१ झाली आहे तर ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात संसर्गाची २८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी पहाटे राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात म्हटले आहे की कोविड -१९च्या कारणामुळे मृत्यू झालेल्यांची … Read more