SpiceJet च्या पायलटलाच झाली कोरोनाची लागण, सर्व स्टाफला क्वारंटाइनचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोनासंसर्गाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, स्पाइसजेट एअरलाइन्सच्या पायलटला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. वैमानिक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तथापि, एअरलाइन्सने म्हटले आहे की संबंधित पायलटने मार्चमध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवलेली नाहीत. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आमचा एक सहकारी स्पाइसजेटचा पहिला अधिकारी कोविड -१९ च्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. … Read more

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जगभरात कोरोनाचा कहर झाला आहे. जगात कोरोना विषाणूचे ६ लाख ६४ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर मृतांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या मध्य चीनमधील वुहान शहरात आता त्यावर नियंत्रण केले गेले आहे. त्याच वेळी, अमेरिका आणि युरोप देशांमध्ये कोविड -१९ पासून संक्रमित … Read more

कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा, सरकार तुमची सोय करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार … Read more

राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. … Read more

धक्कादायक! अमेरिकेत २४ तासांत ४५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २९ मार्च (एएफपी) जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वाधिक लोकांची संख्या सध्या अमेरिकेत आहे आणि या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शनिवारी विक्रमी उच्चांकावर पोहोचली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ट्रॅकरने ही आकडेवारी उघड केली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोविड -१९ या आजारामुळे ४५० पेक्षा जास्त लोक मरण पावले. या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

इटलीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांवर; तर युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जीवघेणा करोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजार २३ झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी बीसीसीआयने’पीएम केयर्स’फंडात दिले ५१कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक महामारीचा धोकादायक ठरलेल्या कोविड १९ या भयानक विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांनी शनिवारी (२८ मार्च) एक निवेदन जारी केले की, कोरोनाशी लढा देण्याच्या भारताच्या लढाईत बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला … Read more

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये ५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा ५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले ३ आणि आजचे … Read more

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडतच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधितांची एकूण संख्या १९३ झाली आहे. ७ रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर … Read more