पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

परभणीतील 9 संशयीत रुग्णांचे स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी असून अद्याप पर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या संशयित रुग्णांमध्ये एकाही रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने अजून तरी जिल्ह्यात कोरोणा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांना बळी पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण … Read more

अफवांना बळी पडू नका! परभणी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे २१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले … Read more

गावात येऊ नका, गावातून जाऊ नका! रायपूर वासियांचा कडेकोट लॉकडाऊन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हे सर्व केले जात आहे. यादरम्यान हे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी केले जात असताना काहीजण मुद्दामून किंवा अनावधानाने याचं पालन करत नाहीयेत .त्यामुळे या विषाणूची बाधा होण्याची शक्यता वाढली आहे .पण काही लोक असेही … Read more

लष्कराला बोलवावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळ जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’च्या … Read more

सहा महिने सर्व प्रकारची कर्ज वसुली बंद करा; सोनियांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. सोनियांनी आपल्या पत्रात पुढील ६ महिने सर्व प्रकराची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. सोनियांनी आपल्या चार पानांच्या पत्रातून पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पुढील ६ महिन्यासाठी पीक कर्ज वसुली थांबवावी. … Read more

लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी … Read more

धक्कादायक! ‘होम क्वारंटाईन’मधून पुजारी अंबाबाई मंदिरात; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर लंडनहून परतल्यानंतर होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश असतानाही अंबाबाई मंदिरात पुजेसाठी आलेल्या पुजाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. १४ मार्च ते ३१ मार्चपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश असताना संबधित पुजारी बुधवारी सकाळी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात पुजेच्या साहित्यासह आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत ही कारवाई केली. संबधित … Read more

राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२२ वर; अशी आहे जिल्हावार करोनाबाधीत रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची ११६ वरून १२२ झाली आहे. आज दिवसभरात १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे ४ जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर आता मुंबईत नव्याने ५ आणि … Read more

पाकिस्तानला करोनाची मगरमिठी; करोनाबाधितांची संख्या १ हजारावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाला करोना व्हायरस गुडघे टेकायला लावत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानात सुद्धा करोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजारवर पोहोचली आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानला करोना व्हायरसची मगरमिठी बळकट होताना दिसत असून चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणे पाकिस्तानात अजूनही पूर्णपणे लॉकडाउन करण्यात … Read more