नोकरी करणाऱ्यांनी ‘या’ अ‍ॅपद्वारे कोरोना काळात त्यांचे PF चे पैसे काढले, असा घ्या फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ साथीच्या काळात EPFO च्या सदस्यांमध्ये युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) खूप प्रभावी आणि लोकप्रिय होते आहे कारण त्यांना घरबसल्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवा मिळत राहिल्या. सध्या कोणत्याही पीएफ सदस्याला त्याच्या मोबाईल फोनवर ‘उमंग अ‍ॅप’ चा वापर करून 16 वेगवेगळ्या EPFO च्या सेवा मिळू शकतात. या सेवा मिळविण्यासाठी EPFO … Read more

कोरोना मीटर! गेल्या २४ तासात ५३ हजार ६०१ नव्या कोरोबाधितांची नोंद तर ८७१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून रुग्णांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ५३ हजार ६०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची २२ लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात … Read more

देशभरात आतापर्यंत १५ लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली । कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालाकडून एक दिलासा देणारी बाब समोर येत आहे. भारतात आतापर्यंत १५ लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे असून ही महामारी लवकरच नियंत्रणात येईल असं ट्विट आरोग्य मंत्रालयाने केलं. याशिवाय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती दिली. देशात १० … Read more

.. अखेर राहुल गांधींचा ‘तो’ दावा खरा ठरला!

नवी दिल्ली । भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे. मागील काही दिवसापासून दरदिवस 55 हजारापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी ठोस उपायजोजना न केल्यास देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याचा दावा काँग्रेस नेते राहुल … Read more

‘कोरोनाबाधितांचा आकडा २० लाख पार.. कुठं गायब झाली मोदी सरकार’; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला असताना देशातील मोदी सरकार मात्र गायब आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्विटरवरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा … Read more

गेल्या 1 महिन्यामध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी हेल्थ इंश्योरेंस क्लेम करणार्‍या लोकांची संख्या 240% वाढली, काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ ची प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दरमहा ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस वरील उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या हेल्थ क्लेमची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार, सर्व सामान्य विमा कंपन्यांची … Read more

कोरोना रुग्ण संख्येचा विक्रम; गेल्या २४ तासात देशात आढळले तब्बल ५७ हजार ११७ नवे रुग्ण

मुंबई । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दरोरोज मोठ्या प्रमाणावर कोरोनग्रस्त सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे (Coronavirus) ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या ३ दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी … Read more

१०० टक्के लॉकडाउन आता योग्य नाही; कोरोनासोबत जगावचं लागेल- नितीन गडकरी

मुंबई । देशात पुन्हा १०० टक्के लॉकडाउन योग्य नसल्याचं मत व्यक्तीगत मत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत … Read more

दिलासादायक! भारताच्या कोरोना रिकव्हरी रेटमध्ये मोठी वाढ

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या संकटात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता ६४.४ टक्के इतकं झालं आहे. एप्रिल महिन्यात रिकव्हरी रेट ७.८५ टक्के इतका होता अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. आत्तापर्यंत देशात १ कोटी ८१ लाख, ९० हजार करोना चाचण्या करण्यात … Read more

कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- बाळासाहेब थोरात

मुंबई । देशात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा … Read more