.. अखेर राहुल गांधींचा ‘तो’ दावा खरा ठरला!

नवी दिल्ली । भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे. मागील काही दिवसापासून दरदिवस 55 हजारापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी ठोस उपायजोजना न केल्यास देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला होता. १७ जुलैला एका ट्विटद्वारे त्यांनी हा दावा केला होता. राहुल गांधींचा हा दावा ३ दिवस आधीच खरा ठरल्याने त्यांचे ते ट्विट सध्या चर्चेत आहे.

काय म्हणले होते राहुल गांधी
राहुल गांधी यांनी १७ जुलै रोजी एक ट्विट करत १० ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्या असंही त्यांनी म्हटलं होतं. महत्त्वाचं म्हणजे भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्येने १० ऑगस्टच्या आधीच २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या २० लाख पार, पण गायब झालं मोदी सरकार
भारतातील रुग्णसंख्या २० लाखांच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी “कोरोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” असं म्हटलं आहे. करोनाबाधित देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त असून ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like