राज्यात ‘या’ जिल्ह्यांत होतोय कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई । कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (Dry Run) म्हणजेच रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या ४ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्राकडून देशात’ सिरम’च्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन … Read more

‘या’ मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येईल कोरोना लशीची नोंदणी; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन (CO-WIN APP) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील. आरोग्य सचिव (Health Secretary) राजेश भूषण यांनी पत्रकार … Read more

कोरोनावर लस आली म्हणजे तो संपेल असं नाही, तर.. ; WHO ने दिला मोठा इशारा

जिनेव्हा । कोरोनावरील लशीसाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश येत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. कोरोनावरील लस ही जादूची गोळी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनावर लस आली म्हणजे … Read more

गुड न्यूज! भारताने केली तब्बल १६० कोटी कोरोना लसींच्या डोसची ‘बुकिंग’; ‘या’ कंपन्यांसोबत करार

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोना लसीची डोळे लावून वाट पाहत आहे. दरम्यान, काही कंपन्यांना कोरोनावर लस शोधण्यास जवळपास यश मिळालं आहे. अशा वेळी जगभरात कोरोना लशींची या कंपन्यांकडे आगाऊ नोंदणी करण्याची चढाओढ लागली आहे. त्यातच आता कोरोना व्हायरसच्या लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारत आघाडीवर असून जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताने आतापर्यंत कोविड-19 लसीच्या … Read more

‘कोरोनाची लस कधी येणार माहिती नाही, पण…’आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात … Read more

आज भारतीय शेअर बाजाराने पुन्हा गाठली ऐतिहासिक पातळी, सेन्सेक्स-निफ्टीमधील या विक्रमाचे खरे कारण जाणून घ्या

मुंबई । अमेरिकेनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आशियाई बाजारातील तेजीमुळे नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. आज सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यापारात जवळपास 300 अंकांची वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर, मिडकॅप समभागात खरेदीची प्रक्रिया आजही सुरू आहे. सध्या बीएसईचा -30 समभाग असलेला सेन्सेक्स जवळपास 275 अंकांनी वधारला आणि 44795 च्या नव्या शिखरावर पोहोचला. एनएसईचा -50 समभागांचा प्रमुख निर्देशांक असलेला … Read more

गुड न्यूज! सिरमची कोरोनावरील लस येणार फेब्रुवारीत! किंमत असेल फक्त…

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस … Read more

नारायण मूर्ती म्हणाले -” कोरोनाची लस देशवासियांना विनामूल्य देण्यात यावी”

नवी दिल्ली । कोरोना लस (Covid-19 Vaccine) कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील लोक आतुरतेने या लसीची वाट पाहत आहेत. Moderna आणि Pfizer यासारख्या प्रमुख औषध कंपन्यांना आशा आहे की, कोरोनाव्हायरसच्या ज्या लसीवर ते काम करत आहेत त्याचा चांगला परिणाम होणार आहे. परंतु ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे की नाही, तसेच याची किंमत … Read more

कोरोनाची लस तयार करणार्‍या ‘या’ दाम्पत्या विषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जगभरातील लोक कोरोनाव्हायरसच्या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अशी शक्यता आहे की, Pfizer ची ही कोविड लस आतापर्यंत या लसीबद्दल विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आतापर्यंत कोविड -१९ मुळे जगभरातील सुमारे 13 लाख लोकांनी प्राण गमावले आहेत. मूळच्या तुर्की येथील मात्र जर्मनीत राहणाऱ्या या जोडप्याने Pfizer च्या COVID-19 Vaccine लसद्वारे … Read more

दिवाळीच्या अगोदर सोन्याच्या किंमतीत झाली गेल्या 7 वर्षांतील सर्वांत मोठी घसरण, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

मुंबई । कोरोनाव्हायरसच्या लसीविषयी चांगली बातमी आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांहून अधिक खाली आल्या आहेत. टक्केवारीच्या बाबतीत 2013 नंतर एका दिवसात सोन्यातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या संकेतांचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येईल. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतींमध्ये … Read more