ऋषभ पंतच्या जागी ‘हा’ खेळाडू करणार दुसऱ्या वन-डेत विकेट किपींग

मुंबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यामुळं ऐनवेळी केएल राहुलला या सामन्यांत यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागली होती. पंतला दुखापतीमुळं आराम देण्यात आला असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव; डेव्हिड वॉर्नरची शतकी खेळी

टीम हॅलो महाराष्ट्र : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या पहिल्याच सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस आली आणि 49.1 षटकांत 255 धावांवर बाद झाली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणतीही विकेट न गमावता … Read more

भारत – ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान CAA, NRC विरोधात निदर्शने

हॅलो महाराष्ट्र टीम : भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी सीएएला विरोध केला. त्याचबरोबर निषेधाच्या भीतीमुळे काळ्या कपड्यांना बंदी घातल्याची माहितीही मिळाली आहे. पण सामन्यादरम्यान बरीच प्रेक्षक ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसले. स्टेडियममधील एका स्टँडमध्ये, काही प्रेक्षकांच्या टी शर्टवर … Read more

सचिन सोबत धोनीचे पुनरागमन; दोघेही दिसणार एकाच सामन्यात

टीम हॅलो महाराष्ट्र : सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी याच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोघेही एकाच सामन्यात खेळताना दिसणार आहेत. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तो एकाही सामन्यात दिसला नाही. आता या सामन्यात सचिन तेंडुलकर या आपल्या जुन्या साथीदारासोबत धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या … Read more

धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही – हार्दिक पांड्या

धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मी आता त्याचा विचार करत नाही. मी सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मी जे काही करेन ते माझ्या संघाच्या भल्यासाठी असेल यात काही शंकाच नाही” असं मत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केलं.

टी-२० क्रिकेटमध्ये २४ तासांत ३ हॅटट्रिक्सची नोंद

टी-२० क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही  इतका जलद या सामन्यांचा फॉरमॅट आहे. टी-२० म्हटलं की नुसती चौकार आणि षटकारांची आतिषबाजी असं सर्वसाधारण समीकरणं पाहायला मिळतं. मात्र, या समीकरणाला छेद देणाऱ्या घटना गेल्या २४ तासांत घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीगमध्ये मागील २४ तासात २ तर सुपर स्मॅश लीगमध्ये एका हॅटट्रिक्सची नोंद झाली आहे

धोनीला मागे टाकत कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या टी-२० सामन्यात जलद हजार धावा पूर्ण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. यावेळी विराटने माजी कर्णधार महिंद्रसिंग याला मागे टाकत कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात सर्वात जलद धावा पूर्ण करत रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेवटाला सुरवात – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी देशातच नव्हे तर परदेशात देखील निदर्शन होत आहे. जर्मनीतील एका टीव्ही वाहिनीने हुकूमशहा हिटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना करणारे एक पोस्टर दाखवले. त्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता. हे ट्विट पाकिस्तानच्या आसिफ गफूर यांनी त्यांच्या ट्विटर हेडरवरून पुन्हा ट्विट केले आहे. या ट्विटला उत्तर … Read more

धक्कादायक! गौतम गंभीरला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर याने माध्यमांना दिली आहे. धमकी प्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे. गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर … Read more

सना लहान आहे, तिला अशा प्रकरणापासून दूर ठेवा; सना गांगुलीची पोस्ट व्हायरल

सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.