हिंगोलीत मुजोर कंत्राटदाराकडून मजुरांवर गोळीबार, दोन जखमी
हिंगोली इथं सुरू असलेल्या महामार्गाच्या कंत्राटदाराने मजुरांवर गोळीबार केल्याची घटना कनेरगाव नाका परिसरात घडली. पैशाच्या कारणावरून वाद घालीत कंत्राटदाराने आपल्याकडील पिस्तुलने मजुरांवर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संजय कुमार व हरिराम निषाद हे दोन मजूर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी हिंगोली इथं हलविण्यात आल आहे.