अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का; अमरीश पटेल भाजपा मध्ये प्रवेश करणार

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरही काँग्रेसला लागलेली गळती थांबलेली नाही. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल हे भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (९ ऑक्टोबर) शिरपूरमध्ये सभा होत आहे. या सभेतच ते भाजपात प्रवेश करणार आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

धुळे प्रतिनिधी |  घरकुल योजनेत भष्टाचारा केल्याच्या प्रकरणात तुरुंगाच्या सानिध्यात असणारे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. कारण त्यांच्या नावे आणखी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. द्वारकाधीश उपसा सिंचन प्रकरणात हेमंत देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणीदेखील गुन्हा दाखल करण्यात … Read more

घरकुल घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

धुळे प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक केल्याची घटना आज धुळे शहरात घडली. जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन फेटाळताच पोलिसांनी त्यांना न्यायालयातच अटक केली आहे. डॉ. हेमंत देशमुख असे या नेत्याचे नाव असून ते काँग्रेस सत्तेत असताना राज्यमंत्री होते. अटकपूर्व जामीनाची मुदत संपत आल्याने हेमंत देशमुखांनी त्यांनी न्यायालयात कारवाही पुढे ढकलण्याची विनंती केली … Read more

विकासासाठी मी सैतानाबरोबर युती करण्यास तयार, अा. अनिल गोटे यांची खळबळजनक प्रतिक्रिया

Anil Gote MLA

धुळे | शहराच्या विकासासाठी मी सैतानाची मदत घेईन असे वाक्य १५ वर्षापूर्वी वापरले होते. राजवर्धन कदमबांडे यांना सोडून गेलेल्या घाणेरड्या दुषित रक्त पिऊन जगणाऱ्या जळवा आता त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीकडे विकासाची दृष्टी असलेल्या कुठलीही व्यक्ती दुर्लक्ष करू शकत नाही. धुळे शहराचा विकास व येत्या पाच वर्षात देशातील सुंदर स्वच्छ पहिल्या १० महानगरात धुळे … Read more

केरळ राज्यात सर्वात मोठे आरोग्य शिबीर महाराष्ट्र राज्याने भरवले – मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस

Devendra Fadanvis in Dhule

धुळे | केरळ मधील पूरानंतर महाराष्ट्राने तेथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करत सर्वात मोठे आरोग्य शिबीर भरवले होते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी धुळे येथे केले. शासनाच्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालयाला एक महिन्याच्या आत सीटी स्कॅन व MRI मशीन उपलब्ध करून देण्याची तसेच शहरातील पाणी समस्या दूर … Read more