धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी

शहापूर विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कृष्णा भवर यांच्या प्रचारार्थ मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मा. खासदार सिताराम येचुरी यांची प्रमुख उपस्थिती होती

सर्जिकल स्ट्राईकमध्ये चुकलेल्या चंदू चव्हाणची शोकांतिका

सेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे.

घरकुल घोटाळ्यात शिवसेनेचे जैन आणि राष्ट्रवादीचे देवकर दोषी ; दोघांसह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

धुळे प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे निर्देश धुळे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसेच कोणत्याही क्षणी न्यायालय या प्रकरणी शिक्षेची सुनावणी करू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर या … Read more

धुळ्यात केमिकल फॅक्टरीत स्फोट, ७ जणांचा मृत्यू

टीम, HELLO महाराष्ट्र | शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर भीषण आग लागल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.   या घटने बाबतची अधिक माहिती अशी की, शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी केमिकल फॅक्टरीत आज सकाळी … Read more

काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली : देवेंद्र फडणवीस

धुळे प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झाला आहे. यात्रेच्या निमित्त पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चौफेर टीका केली आहे. काँग्रेसची भष्टाचाराची जत्रा उघडी पडल्याने त्यांनी यात्रा रद्द झाली त्यांची यात्रा निघणार आहे की नाही याची मला माहिती नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तुम्ही … Read more

घरकुल घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

धुळे प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक केल्याची घटना आज धुळे शहरात घडली. जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन फेटाळताच पोलिसांनी त्यांना न्यायालयातच अटक केली आहे. डॉ. हेमंत देशमुख असे या नेत्याचे नाव असून ते काँग्रेस सत्तेत असताना राज्यमंत्री होते. अटकपूर्व जामीनाची मुदत संपत आल्याने हेमंत देशमुखांनी त्यांनी न्यायालयात कारवाही पुढे ढकलण्याची विनंती केली … Read more

भाजपच्या पराभवासाठी अनिल गोटेंनी घेतली पवारांची भेट…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | धुळ्यातील भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल २६ वर्षांनी भेट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी लढण्याची भूमिका अनिल गोटे यांनी घेतली आहे. अनिल गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टोकाची टीका केली आहे. … Read more

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि धुळे या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेचा निवडणुकीसाठी या सभा महत्वपूर्ण ठरणार आहेत. धुळ्यात त्यांची पहिली सभा दुपारी २ वाजता होणार आहे . तर मुंबई मध्ये वांद्रे येथील एमएमआरडी च्या मैदानावर ५ वाजता आयोजित करण्यात … Read more

सरकारी मदत मिळाल्या शिवाय मृतांच्या अस्थीचे विसर्जन करणार नाही, धुळे हत्याकांड

thumbnail 1531485441869

सोलापूर | धुळे हत्याकांडात मारल्या गेलेल्या मंगळवेडा तालुक्यातील त्या पाच व्यक्तींच्या नातेवाईकांनी सरकारने जाहीर केलेली मदत हातात मिळाल्याशिवाय मृतांच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अस्थींचे विसर्जण करणार नाही अशी भुमिका घेऊन मृतांच्या कुटंबियांनी अस्थी झाडावर टांगून ठेवल्या आहेत. काय आहे प्रकरण ? १ जुलै रोजी धुळ्यातील … Read more