ऐन दिवाळीत एसटी कडून तब्बल १० टक्के तिकीट वाढ
दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल.