ओक्लाहोमा येथून पुन्हा एकदा निवडणुक रॅली सुरु करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओक्लाहोमा या राज्यातून आपली निवडणूक प्रचार रॅली पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ते टेक्सास, फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत आपला मोर्चा वळवतील. कोरोना या जागतिक साथीच्या विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या निवडणूक सभा तहकूब केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प … Read more

राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ नावाची चर्चा

सांगली प्रतिनिधी | आगामी राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातून माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.  राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांची निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची प्राधान्याने जोरदार … Read more

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. […]

कोरोनाची लस सोडा तुम्ही आधी ट्रम्पवर उपचार शोधा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या पोलिसांकडून झालेल्या हत्येचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भारतातूनही अनेकांनी या निषेधात सहभाग नोंदवला आहे. सलोनी गौर या कॉमेडियन तरुणीनेही यावर आपल्या प्रतिक्रियांचा एक व्हिडीओ केला आहे. आपल्या हटके अंदाजात तिने ट्रम्प यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या व्हिडिओत तिने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना … Read more

उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी … Read more

हुश्श! महाविकास आघाडीतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच

मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाने अखेर माघार घेतली असून यामुळे महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक पार पडली. यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. “विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले … Read more

पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती!

सांगली । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘आरक्षण आंदोलन’ उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा … Read more

चीन व्हिलन असल्याचे सांगून निवडणुका जिंकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून … Read more

कोरोनाशी लढण्याच्या भावनेचे दक्षिण कोरियाच्या लोकांकडून कौतुक;अध्यक्षीय निवडणुकीत सरकारला स्पष्ट बहुमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस साथीच्या काळात जेथे अनेक देशांमध्ये सरकारे आणि राजकारण्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे, तेथे दक्षिण कोरियामधील सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत पुन्हा जनतेने निवडून दिले आहे. कोरोना या साथीच्या दरम्यान झालेल्या संसदीय निवडणुकीत दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांना जनतेने विक्रमी बहुमत … Read more