व्यापारी आणि कंपन्यांसाठी चांगली बातमी! आता लवकरच मिळेल आधीच भरलेला GST Return Form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जीएसटी-रजिस्टर्ड व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी (GST Registered Companies and Business owners) एक चांगली बातमी आहे. आता त्यांना जीएसटी रिटर्न फाइल (GST Return File) दाखल करणे सोपे होईल. आता त्यांच्याकडे लवकरच आधीच-भरलेला (प्री-फिल्ड) रिटर्न फॉर्म जीएसटीआर -3 बी उपलब्ध होईल. जीएसटी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. कुमार … Read more

संघर्ष अटळ! राज्यांच्या वाट्याची GSTची भरपाई देण्यावर केंद्रानं केले हात वर

नवी दिल्ली । वस्तू व सेवा करासाठी (GST) नेमण्यात आलेल्या ‘GST’ कौन्सिलच्या शेवटच्या बैठकीत GST थकबाकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये मतभेद झाले होते. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केंद्राकडून जीएसटी महसुलातील राज्यांना देण्यात येणाऱ्या वाट्याची अर्थात नुकसानभरपाईची रक्कम वाढवून देण्यावरून वाद झाला होता. जीएसटीचा महसूल वाढावा यासाठी आणखी काही वस्तूंना तसेच इंधनांना जीएसटीअंतर्गत आणावे यासाठी राज्यांची … Read more

फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किंमती होतील कमी; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे संकेत

नवी दिल्ली । लॉकडॉउनमध्ये देशात वाहन विक्री ठप्प झाली होती. लॉकडाऊन शिथिल होताच अन्य व्यवसायानंबरोबर वाहन विक्रीला सुद्धा सुरू झाली. मात्र, वाहनांच्या किंमती वाढल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळं तुम्ही जर कार, बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणं तुमच्या फायद्याचं ठरु शकतं. कारण सरकार फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता … Read more

आम्ही उधार घेण्यापेक्षा केंद्रानंच उधारी घेऊन GSTची थकबाकी द्यावी, राज्यांचा केंद्राला पर्याय

नवी दिल्ली । GST थकबाकीसंबंधी केंद्रानं राज्यांना दिलेला पर्याय धुडकावून लावत या राज्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘केंद्र सरकारनं राज्यांना बाजारातून वेगवेगळी उधारी घेऊन देण्यापेक्षा स्वत:च गरजेनुसार उधारी घ्यावी आणि GSTची थकबाकी राज्यांना द्यावी’ अशी सूचना देणारं सहा बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र धाडलं आहे. राज्यांनी उधारी घेतली तर ती … Read more

कोरोनाच्या या संकटात उद्योजकांसाठी मोठी बातमी – GST संदर्भात सरकारने ‘हा’ घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने कंपोजीशन योजनेंतर्गत सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत त्यांनी दोन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. आता ती 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे की, जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली. यापूर्वी हा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख … Read more

राज्यांना कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवणं, याला जबाबदारी घेणं म्हणतं नाहीत- रोहित पवार

पुणे । गेले ५ महिने संपूर्ण भारतावर कोरोनाचं संकट आहे. याकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना मदत केली जात होती. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्यामुळे सोशल डिस्टन्शिंगबरोबरच मास्क वापरणं हा एकच उपाय होता. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी पीपीई किट अत्यावश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. असं असताना आता केंद्र सरकारने कोरोना सुरक्षा … Read more

अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा दुप्पटीने वाढू शकते वित्तीय तूट, सरकारी उत्पन्न कमी आणि जास्त खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सन 2020-21 आर्थिक वर्षात भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) एकूण सकल उत्पन्नाच्या (GDP) 7 टक्के होण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात हा अंदाज 3.5 टक्के होता. परंतु कोरोना व्हायरस महामारीमुळे (Corona Virus Pandemic) महसूल संकलनाला (Revenue Collection) मोठा धक्का बसला आहे आणि त्याचा आर्थिक कामांवरही परिणाम झाला आहे. ब्रिकवर्क रेटिंग्जने आपल्या एका अहवालात … Read more

कोरोना जर ‘देवाची करणी’ असेल तर अर्थमंत्री ‘या’ गैरप्रकारावर ‘देवदूत’ बनून उत्तर देणार का?- चिदंबरम

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेत कोरोनाला ”देवाची करणी’ असं म्हटल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर मोठी टीका होतेय. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री सीतारमण यांच्या त्याचं वादग्रस्त विधानावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पी. चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत. ‘कोरोना महामारी जर दैवी घटना असेल तर … Read more

‘त्या’ गोष्टीत रोहित पवारांचे कॅलक्युलेशनचं कच्चं, त्यांनी अभ्यास करून बोलावं; फडणवीसांचा सल्ला

सातारा । एलबीटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सल्ला दिला आहे. भाजपनं घाईघाईनं एलबीटी रद्द केल्यामुळं राज्याचं नुकसान झालं असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर ‘रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे,’ असं फडणवीस म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा … Read more

GST च्या परताव्यासाठी केंद्रानं राज्यांपुढे ठेवले ‘हे’ २ पर्याय

नवी दिल्ली । जीएसटीच्या परताव्यापोटी राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीसंदर्भात आज जीएसटी परिषदेची ४१वी बैठक पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनामुळे ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत राज्यांना २ पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांवर राज्यांना पुढील ७ दिवसांत भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं राज्यांना जीएसटी परताव्यापोटी दोन पर्याय दिले. … Read more