सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

नैसर्गिक वायू, हवाई इंधन ‘जीएसटी’च्या कक्षेत?

इंधन गटातील प्रमुख पाचपैकी नैसर्गिक वायू व हवाई इंधन वस्तू व सेवा कराच्या गटात आणण्याची मागणी केंद्रीय तेल व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. १ जुलै २०१७ रोजी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर त्यातून नैसर्गिक वायू व हवाई इंधनासह खनिज तेल, पेट्रोल व डिझेलला वगळण्यात आले होते. अप्रत्यक्ष करात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध १७ कर रचनेत या पाच वस्तू नसल्याने सरकारला कराचा मोठा स्रोत उपलब्ध झाला.

कॉलर दिवसभर टाईट राहू शकत नाही, माझी मिशी दिवसभर टाईट राहते : नरेंद्र पाटील

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निवडणुकीच्या काळात टीकेची झोड कोणत्या प्रकारे उठवली जाईल हे सांगता येणार नाही. शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर टीका केली आहे. “कोणी दिवसभर काॅलर वर करुन चालु शकत नाही. मात्र माझी मिशी मी दिवसभर टाईट करुन चालु शकतो. लोकांना माझी मिशी आवडते हा साता-याचा … Read more

पेट्रोल, डिझेल GST मध्ये नाहीच

petrol disel

वृत्तसंस्था, नवी दिल्ली|नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याचं धोरण कुठेच दिसत नसताना, हे इंधन GST कक्षेत येईल, ही आशासुद्धा आता मावळली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय प्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार पेट्रोल,डिझेल हे GST च्या कक्षेत आणणार नसल्याचं सांगितले आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांना मात्र याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारकडून … Read more