पंधरा हजारांची लाच घेताना ‘कुबेर’ रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

ACB

औरंगाबाद – खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी सज्जाचे तलाठी कैलास कुबेर याने २५ हजार रुपयांची लाच याचिकाकर्त्याला मागितली. तडजोडीअंती यातील १५ हजार रुपये स्विकारताना त्याच्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. कैलास कुबेर आरोपी तलाठी कैलास तुळीराम कुबेर (ता. खुलताबाद) व राजेश तावजी बांडे (रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड) याच्याविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

कावड यात्रा काढणे आले अंगलट, आमदार दानवेसह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Ambadas danave

औरंगाबाद – श्रावण मासानिमित्त प्रतीकात्मक कावड यात्रा काढल्यानंतर खडकेश्वर येथील महादेव मंदिरात पाठीमागच्या दरवाजाने प्रवेश करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर सिटी चौक व बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कावड यात्रेच्या निमित्ताने गर्दी जमाविण्यात आली होती. तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन … Read more

आईने रागवल्याने चिमुकला घर सोडून निघून गेला अन पोलसांनी दोन तासात शोधून आणला

police

औरंगाबाद – आजकाल लहान मुले रंगाच्या भारत काय करतील काही सांगता येत नाही. अशातच आई रागावल्याचा राग मनात धरुन घर सोडून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा मुकूंदवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोध घेऊन आईवडिलांच्या हवाली केले. विशेष म्हणजे मुकूंदवाडी पोलिसांकडे पालकांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांचे एक पथक तत्काळ कामास लागले. अन् तांत्रिक पद्धतीने शोध घेत … Read more

नांदेड- मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकरच करणार – भागवत कराड

औरंगाबाद – बहुप्रतीक्षित नांदेड- मनमाड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे वैजापुरकरांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रयत्नशील आहोत. विशेष म्हणजे विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून दुहेरीकरण मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे वैजापुरकरांचे हे स्वप्न पूर्ण करू तसेच इतर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द केंद्रीय वित्त … Read more

तब्बल ५२० दिवसांनी मिळाले रेल्वेचे जनरल तिकीट; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

Train

औरंगाबाद – कोरोना महामारीमुळे मागील वर्षी २० मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले आणि सर्व सेवा ठप्प झाल्या त्यामुळे रेल्वेचे देखील चाके रुतली त्यानंतर जुन महिन्यात हळूहळू रेल्वे काही प्रमाणात सुरु झाली. औरंगाबादहून देखील १ जून पासून नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. परंतु ती रेल्वे अजूनही आरक्षित तत्वावर धावत आहे. त्यानंतर … Read more

सातारा देवळाई परिसरातील नागरिकांचे हाल, ड्रेनेजलाईनसाठी दोनशे कोटींचा निधी

औरंगाबाद |  महापालिकेमध्ये 2016 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा देवळाई परिसराचे सध्या प्रचंड प्रमाणात हाल सुरु असून या वसाहतीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणी, पथदिवे या मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या अडीच वर्षापासून महानगरपालिकेने विकास कामे करणार असल्याचा देखावा करत डीपीआर तयार केला. यामध्ये पीएमसी मार्फत पाणी पुरवठा योजनेचा 400 कोटींचा डीपीआर, पीएमसी नियुक्त … Read more

बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळने काढले डोके वर

Ghati hospital

औरंगाबाद |   बदलत्या वातावरणामुळे शहरांमध्ये डेंग्यू, मलेरिया, काविळ या साथी रोगांचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट गेली असून तिसरा लाटेचा धोका कायम आहे. या पावसाळ्याच्या वातावरणामुळे सध्या शहरात साथ रोगांची सुरुवात झाली असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. या रुग्णांवर उपचार करताना त्यांची कोरोना चाचणी करावी असे आदेश मनपाने लेखी पत्राद्वारे … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच; लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

औरंगाबाद – सध्या शहरात लसींचा साठा वाढताच नागरिकांचा प्रतिसाद थंडावला असून, दररोज सुमारे चार ते पाच हजार एवढेच लसीकरण होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या टोकनसाठी लसीकरण केंद्रावर लागणाऱ्या रांगा आता बंद झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लस घेण्यासाठी रांगेत धक्काबुक्की होत असल्याचे चित्र होते पण महापालिकेकडे सध्या एक लाखापेक्षा जास्त कोविशिल्ड लसी आहेत. असे असताना … Read more

घाटी परिचारीकांचे काम बंद आंदोलन; आश्वासनानंतर 2 तासांनी पुन्हा कामावर

ghati

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात आज परिचारिकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे सकाळीच घाट येथील रुग्ण सेवा विस्कळीत झाली होती. परंतु घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाने धाव घेत परिचारिका बरोबर संवाद साधून त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिले त्यामुळे दोन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. घाटी रुग्णालयातील औषध टंचाई, वार्डात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा … Read more

मनपाने मागविली अफगाणिस्तानातून येणाऱ्यांची माहिती; ‘हे’ आहे कारण

aurangabad

औरंगाबाद – तालिबानी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक पलायन करत आहेत. अनेक जण भारतात कुटुंबासह आश्रयासाठी येत आहेत. मात्र, सध्या अफगाणिस्तानात पोलिओचे रुग्ण आजही आढळून येत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातून ही साथ भारतात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून औरंगाबाद महापालिकेने अफगाणिस्तानातून शहरात येणाऱ्या नागरिकांची माहिती मागविली आहे. त्यांचे लसीकरण करण्याची तयारी … Read more