शहर बसने एकाच दिवसात तब्बल 13 हजार प्रवाशांनी केला प्रवास

smart city bus 1

औरंगाबाद – कोरोना संसर्ग व त्यामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली स्मार्ट शहर बस संसर्ग कमी होताच निर्बंध शिथिल होत असताना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हळूहळू शहर बस पूर्वपदावर येत असतानाच सोमवारी एकाच दिवसात शहर बसला तब्बल 13 हजार प्रवासी मिळाले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने 100 शहर बस … Read more

जिल्ह्यातील रस्त्यांचे काम दोन ते तीन वर्षांपासून ठप्प

road

औरंगाबाद : सध्या नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकारण पेटलेले आहे. परंतु या राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या धुराळ्यात शहरातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प झालेली आहेत. या प्रकरणी दळणवळण मंत्री नितिन गडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांमुळे रस्त्यांची कामे खोळंबली असून त्यांना आवर घाला अशी सूचना दिली आहे. अडकून पडलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत … Read more

शहरात बसवले सातशे सीसीटीव्ही कॅमेरे, मंगळसूत्र चोरट्यांना पकडण्यास होणार मदत

CCTV

औरंगाबाद : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्याचबरोबर वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल तसेच आणिबाणीच्या परिस्थितीत पोलीस यंत्रणा लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचावी यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून 176 कोटी रुपये खर्च करून शहरातील वेगवेगळ्या 418 ठिकाणी सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या कॅमेराचे फुटेज चेक करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर ! आता 20 विशेष रेल्वेंमध्ये करता येणार अनारक्षित प्रवास

Train

औरंगाबाद – प्रवाश्यांच्या सुविधे करिता नांदेड रेल्वे विभागातील 20 विशेष रेल्वे गाड्यामधील काही डब्बे पूर्णपणे अनारक्षित करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे ने घेतला आहे. या 20 विशेष गाड्यांचे क्रमांक आणि अनारक्षित केलेल्या डब्यांची संख्या तसेच दिनांक पुढील प्रमाणे आहेत – अनु क्र. गाडी संख्या कोठून कोठे अनारक्षित डब्बे दिनांक 01) 07231 नरसापूर नगरसोल DL-1 & … Read more

रक्षाबंधनानिमित्त बहिणीला माहेरी आणण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

औरंगाबाद |   तिघी बहिणी मध्ये एकुलता एक असलेला भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधण्यासाठी माहेरी आणण्यासाठी जात असताना रस्त्यातच अपघातात या भावाचा मृत्यू झाल्याची घटना वरखेड तालुका गंगापूर फाट्याजवळ सोमवारी घडली. शुभम अशोक शेवाळे (वय 20 रा. भिंगी बोरसर ता. वैजापूर)असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक होता. सोमवारी रक्षाबंधन निमित्त … Read more

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुलींचा डंका

Abacus

औरंगाबाद – मागील महिन्यात अबॅकसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत औरंगाबादची श्रावणी साळवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मृण्मयी चोटमल, संचिता फरकडे, वेदांत निकम, श्रावणी साळवे, तेजस्विनी काळे, संजना सोळुंके, वैष्णवी सोळुंके, प्रिया चिकटे, ऋग्वेद नारखेड़े, अभिजीत शेळके, भक्ती साळवे, वेदांत राठोड, ऋषिकेश खर्चे, संस्कृती सोळुंके या विद्यार्थ्यांनी … Read more

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांना अप्पर महासंचालक पदी पदोन्नती

nikhil gupta

औरंगाबाद – राज्यातील पोलिसांच्या पदोन्नत्या गृह विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. यात औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना अप्पर पोलिस महासंचालक श्रेणीतील ‘पोलिस आयुक्त’ हे नवीन पद निर्माण करून पदोन्नती देण्यात आली आहे. काल रात्री उशिरा या विषयीचे परिपत्रक जारी करण्यात आले. औरंगाबाद शहराचे सध्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील मुळ पद स्थगित करुन त्या … Read more

विद्यापीठाच्या वर्धापनदिनिच 11 अभ्यासक्रम विद्यापीठाने केले बंद

bAMU

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसल्याचे कारण दाखवत अकरा अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विशेष म्हणजे काल विद्यापीठाचा 63 वा वर्धापन दिन होता याच दिवशी हा दुर्दैवी निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अशी टीका अनेक शिक्षण तज्ञांनी … Read more

शाळेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार, पालक आर्थिक संकटात

sboa

औरंगाबाद : कोरोना काळात फीमध्ये सवलत म्हणून पंधरा टक्के रक्कम वार्षिक रकमेतून शाळेतर्फे कमी करण्यात यावी असे परिपत्रक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. असे असताना हे परिपत्रक फेटाळून शाळेचे संचालक मनमानी कारभार करून पालकांकडून हवी तेवढी फीस वसूल करत असल्याचे समोर आले आहे. हडको एन 11 येथे असलेल्या एस.बी.ओ.ए. … Read more

लसीकरणाबाबत उदासीनता; औरंगाबाद जिह्यात केवळ 11 टक्के जनतेचे लसीकरण

covid vaccine

औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, आता लस घेण्यास प्रतिसाद मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०.९४ टक्केच लसीकरण झाले असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान कायम आहे. शहरातही कोरोनाचे दोन्ही डोस घेणऱ्यांची संख्या १६.९९ टक्के आहे, तर ग्रामीण भागात हीच टक्केवारी ७ .७६ एवढी नोंदली गेली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात … Read more