स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार
एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत. नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.