कोलकात्याचा दादा बनणार क्रिकेट जगताचा दादा ? सौरव गांगुलीला आयसीसीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. गांगुली जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बीसीसीआयचे नेतृत्व करीत आहेत. अशातच दुसरीकडे आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांचा कार्यकाळही याच महिन्यात संपुष्टात येतो आहे. यानंतर जुलैमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. गांगुली यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सौरव गांगुलीला आयसीसी अध्यक्ष करावे, असा आवाज … Read more

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने सांगितला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक पॉईंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची गेल्या कित्येक वर्षांपासून तुलना केली जात आहे. कोहलीची सात्यत्तता आणि त्याने केलेल्या धावांमुळे अनेक क्रिकेट विश्लेषक, त्याचे चाहते आणि माजी खेळाडू प्रभावित झाले आहेत. विराट कोहलीचे हे सातत्य आणि त्याचा खेळ पाहता तो सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढेल … Read more

केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. अलीकडेच विराट … Read more

वर्ल्ड कप फायनलमधील पराभव विसरु शकलो नाही – केन विल्यमसन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाला विसरलेला नाही. अंतिम सामन्यात झालेला नाट्यमय पराभव त्याच्या कारकीर्दीतील अपयश होते का हे विल्यमसनला अजूनही उमगलेले नाही. मागीच्या वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्धारित षटक आणि सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडला चौकार आणि षटकारांच्या मोजणीच्या आधारे विजयी घोषित केले … Read more

‘या’ कारणामुळं क्रिकेट सामन्यात चेंडूवर थुंकी लावण्यास बंदीची शिफारस

नवी दिल्ली । क्रिकेटमध्ये चेंडू चमकावण्यासाठी थुंकीचा वापर करणं ही क्रिकेटमधील एक सामान्य ट्रीक आहे. विशेषत: टेस्ट क्रिकेटमध्ये लाल चेंडूवर थुंकीचा वापर स्विंग करण्यासाठी मदत होते म्हणून केला जातो. पण आता थुंकीचा वापरावर बंदी लागू शकते. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतर जेव्हा क्रिकेट सुरू होईल तेव्हा खेळाडूंना त्याची लागण होऊ नये म्हणून आयसीसीकडून चेंडूवर थुंकी लावण्यावर … Read more

क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात … Read more

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या कर्णधारांचे छायाचित्र पोस्ट करताना आयसीसीने झाली ‘ही’ चूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरूवात जरी वेस्ट इंडीजने विश्वचषक जिंकून झाली असली तरी ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या एकूण ११ विश्वचषकांपैकी ५ जिंकून या संपूर्ण स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला, त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉ, २००३ आणि २००७ मध्ये रिकी पॉन्टिंग, तर २०१५ मध्ये … Read more

‘IPL’साठी यंदाची टी-२० विश्वकप स्पर्धा रद्द होणे गरजेचे; ‘हे’ आहे कारण

मुंबई । देशभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा १३ वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. त्यानुसार यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास आयपीएल स्पर्धेचे … Read more

टोकियो ऑलिम्पिकमधून शिकून भविष्यातील जागतिक कसोटी स्पर्धेचे नियोजन केले पाहिजे – सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठी खरे आव्हान म्हणजे कसोटी क्रिकेट हे होय,परंतु याक्षणी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व देशांचे दौरे पुढे ढकलले गेले आहेत आणि त्यामुळे जागतिक कसोटी चँपियनशिपचे भवितव्य मध्यातच अडकले आहे.२०२१ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरकडे यावर … Read more

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरी मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार,मात्र ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरीबरोबर डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम पेजवरील लाईव्ह सेशन दरम्यान त्याला विचारण्यात आले होते की लॉकडाऊन संपल्यानंतर कोणत्या दोन क्रिकेटपटूंबरोबर तुला डिनरला जायला आवडेल.भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसह मुरली विजयने या अ‍ॅलिस पेरीची निवड केली. … Read more