दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी … Read more

औरंगाबादमध्ये एकही दारूचं दुकान उघडू देणार नाही- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । ”जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू” असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं रेड झोनमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून दारूची दुकान सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं तळीरामांकडून स्वागत होत असलं तरी, काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत … Read more

गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आणि अनुराग ठाकूर यांना तुम्ही कधी का? प्रश्न केला नाही- इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी । ”देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही काही लोकांना निदर्शने करावी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. एमआयएम कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन करू शकत नाही.” असं म्हणत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी वारीस … Read more

मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आत्ताच कसा झाला?; जलील यांची राज ठाकरेंवर टिका

औरंगाबाद: राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. ‘राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का,’ अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईत काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय म्हणून आम्ही तयार; उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईन – इम्तियाज जलील

“उध्दव ठाकरेंनी औरगांबाद मध्ये टीका केली असून, मीही उध्दव ठाकरेंना औरगांबाद मध्ये जाऊनच उत्तर देणार असल्याचं जलील म्हणाले.

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

फुलंब्रीमध्ये मुस्लिम मतांचं सेटिंग, काँग्रेसला मदत केल्याचा इम्तियाज जलीलांवर गंभीर आरोप

फुलंब्री मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिलावर बेग यांनी इम्तियाज जलील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे.

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

औरंगाबाद महापालिका आयुक्त महापौरांच्या इशाऱ्यावर नाचतात, खासदार जलील यांचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबाद शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु महानगरपालिका आयुक्तांना याबाबत काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांना जर विकास कामाबद्दल माहिती विचारली तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच कुठलंही काम हे महापौरांच्या इशारवरच करत असल्याचे गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांवर केले. कचरा साठवून ठेवलेल्या … Read more

अखेर..वडिलांच्या उपचारासाठी दूरदर्शनच्या टॉवर वर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी। वडिलांचे यकृत खराब झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाने सर्वांच्या पायऱ्या झिझवल्या, उपोषण केले मात्र दाखल घेतली जात नसल्याने आत्महत्येची धमकी देत तरुण थेट दूरदर्शनच्या टॉवरवर चढला त्यानंतर लोक प्रतिनिधी व नागरिकांनी त्यास आश्वस्त केल्यानंतवर तो खाली उतरला.नागरिकांनी उपचारासाठी तरुणाची आर्थिक मदत केली. मंगेश संजय साबळे या तरुणाच्या वडिलांना यकृताचे … Read more