‘गुगल’वर धोनी बद्दल सर्च करा पण जरा जपून!
तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ ‘माही’चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. एका अँटीव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे.