५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.