काश्मीरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाला भारतीय जवानांनी शर्थीने वाचविले: पहा व्हिडिओ

टीम हॅलो महाराष्ट्र। जम्मू-काश्मीरमधील लाचीपुरा येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तारिक इक्बाल या नागरिकाला भारतीय लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयन्त करत वाचवले. बर्फाच्या ढिगाऱ्यातून काढल्यानंतर गंभीर अवस्थेत इकबालला उपचारातही हलविण्यात आलं होत. इक्बालची प्रकृती साध्य ठीक असून हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पहा व्हिडिओ-   #WATCH Jammu & Kashmir: Indian Army personnel rescue a civilian Tariq Iqbal … Read more

कलम ३७० हटवणं हे ऐतिहासिक पाऊल – लष्करप्रमुख नरवणे

भारताचे नवनिर्वाचित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरमधील कलाम ३७० हटवण्यावरून आज पहिल्यांदाच भाष्य केलं. कलम ३७० रद्द करणे हे एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे असं नरवणे पुढे म्हणाले. आर्मी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहिदांप्रती श्रद्धांजली ही व्यक्त केली.

हिजबूलचे दहशतवादी २६ जानेवारीला करणार होते मोठा हल्ला; अटक करण्यात आल्याने फसला कट

हिजबूल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेले निलंबित जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंग यांच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडे २६ जानेवारीला राजधानी दिल्ली, पंजाब आणि चंदिगडमध्ये स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी दिली होती असं उघड झालं आहे. स्फोट घडवण्यासाठी अजून काही दहशतवादी त्यांना सोबत देण्यासाठी येणार होते असंही सुत्रांकडून समजलं आहे. तर या दहशतवाद्यांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी देविंदर सिंग मदत करत करत होते.

…जर आदेश मिळाला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ- लष्करप्रमुख नरवणे

‘भारतीय संसदीय ठरावानुसार संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.संसदेला जर पाकव्याप्त काश्मीर हवं असेल तर ,आम्हाला त्याबाबत आदेश मिळाल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू” असं विधान भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत माध्यमांशी संवाद साधतांना केलं. पाकव्याप्त काश्मीरबाबत विचारलेल्या एका प्रश्नाबाबत त्यांनी हे उत्तर दिलं.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ओढले ताशेरे; काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी आणणं जाचक

सर्वोच्च न्यायालयात काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल निर्बंधाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी आज पार पडली. न्यायमूर्ती एन व्ही रमणा, आर सुभाष रेड्डी आणि बी आर गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने काश्मीरमधील निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर गतवर्षी २७ नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण केली होती त्यावर आज निकाल देण्यात आला.

कराडचे शहीद संदीप सावंतांचं पार्थिव शुक्रवारी गावी येणार

कराड तालुक्यातील मुंढे गावचे संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहिद झाले असुन सातारा जिल्हयासह गावकऱ्यांना संदिप यांचे पार्थीवाची प्रतिक्षा आहे. या ठिकाणच्या अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण झाली असून अंतिम संस्कार शुक्रवारी पार पडण्याची शक्यता आहे.

नियंत्रण रेषेवर लढताना कराडच्या जवानाला आलं वीरमरण; जवान संदीप सावंत शहीद

जम्मू -काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्यापैकी कराड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवाशी संदीप रघुनाथ सावंत वय २९ यांचा समावेश आहे. 

काश्मिरमध्ये ‘एसएमएस’ सेवा पुन्हा सुरू;  इंटरनेट मात्र बंदच

यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी ‘एसएमएस’ सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका

जम्मू आणि काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ५ ऑगस्ट रोजी हटवण्यात आल्यानंतर, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून केंद्राच्या निर्बंधांनंतर काश्मिरातील हस्तव्यवसाय, पर्यटन आणि ई-कॉमर्स या व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, असा दावा काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (केसीसीआय) अध्यक्ष शेख आशिक हुसेन यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याला रवानगी

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालपद अत्यंत दुर्बल असते, राज्यपालांना पत्रकार परिषद आयोजित करण्याचे अथवा आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचे अधिकारही नसतात असे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी मलिक यांनी व्यक्त केले होते.