निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांचा लालूंना झटका; ५ आमदारांचा जेडीयूत प्रवेश

पाटणा । लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या ३ विधान परिषद सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर जनता दल यूनायटेड पुन्हा एकदा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ज्या आरजेडीच्या सदस्यांनी जेडीयूत प्रवेश केला आहे, त्यांमध्ये कमर आलम, संजय प्रसाद, राधाचरण सेठ, दिलीप राय, रणविजय … Read more

प्रशांत किशोर हा जदयुतील कोरोना व्हायरस; बदलत्या भूमिकांवरुन अजय आलोक यांचं टीकास्त्र

प्रशांत किशोर हा माणूस विश्वासू नाही. तो मोदी, ममता, नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करु शकतो म्हणजेच तो जिथे जाईल तिकडे कोरोना विषाणूसारखा पसरत असल्याची टीका अजय आलोक यांनी केली.

भारताचा आत्मा १६ राज्यांच्या बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांवर अवलंबून – प्रशांत किशोर

आता न्यायव्यवस्थेच्यापलीकडे भारताचा आत्मा वाचविण्याची जबाबदारी भाजपाची सत्ता नसलेल्या 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे या राज्यातील मुख्यमंत्र्यांची नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करायचा की नाही, ते ठरविले पाहिजे. नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू करणार नसल्याचे पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकत्व कायद्याबाबत इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे” असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता जेडीयू कडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.