कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी : रणजित पाटील

Karad City Press Conference

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना … Read more

महामार्गावर ट्रक- आयशरचा भीषण अपघात : केबिनमध्ये चालक आडकला

Pune-Bangalore Highway Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर वराडे (ता.कराड) गावाजवळ आज दुपारी ट्रक व आयशरचा भीषण अपघात झाला. यामध्ये आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकला होता. सुदैवाने, जीवितहानी झाली नाही, मात्र आयशरच्या चालकाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ ट्रकला पाठीमागून आयशरने (क्र.- MH- 12-DG-8083) … Read more

रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराचा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम स्तुत्य : अरूण पाटील

Ramkrishna Vetal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजातील प्रत्येक घटकांने सामाजिक भान जपत काम करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात समाज उपयोगी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. रामकृष्ण वेताळ मित्र परिवाराने आज शेकडो मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गाैरव उद्दगार कृष्णा- कोयना पतसंस्थेचे चेअरमन अरूण पाटील यांनी काढले. सुर्ली (ता. कराड) … Read more

कर्मचाऱ्याने मारली थोबाडीत अन् ग्राहक घुसला चाकू घेवून बॅंकेत

HDFC Bank Karad

कराड | बँकेतील कर्मचाऱ्याने थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला ग्राहक धारदार चाकू घेऊन बँकेत घुसला. आधार कार्ड लिंक करण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी बँक व्यवस्थापकांसह इतर ग्राहकांनी संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन रामा भिसे (रा. विजयनगर-मुंढे, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. … Read more

शेतकर्‍याच्या पोरीचा नादच न्हाय! पायात शूज घालून पळण्याचा सराव नसल्यानं अनवानी धावून मिळवलं सुवर्णपदक

Running Without Shoes

कराड | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते. घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा काहीजणांना शालेय जीवणात मोठा संघर्ष करुन शिकावं लागतं. शेतकरी कुटूबांतील मुलं- मुली तर अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्येही तरबेज असतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दानशूर बंडो गोपळा कदम उर्फ मुकादम तात्या विद्यालयात आला आहे. पायात शूज नसल्याने … Read more

डोंगरी तालुक्यांना विकासासाठी विशेष पॅकेज : आ. शंभूुराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांच्या विचारांनी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या भागात विकास कामांची झाली आहेत. सुपने- तांबवे भाग केवळ विकास कामांची पाठराखण करणारा असल्याने गावांची विकास कामांची भूक थांबताना दिसत नाही. परंतु मीही लोकप्रतिनिधी असल्याने काकांची दूरदृष्टी समोर ठेवून विकास कामांना प्राधान्य देत आलो आहे. शिंदे सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी … Read more

सूनबाई जोरात : कालेच्या शीतल देसाईंना Olympic मध्ये नेमबाजीत गोल्डसह 2 सिल्वर मेडल

Sheetal Desai Sports

कराड | पुण्यात शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत काले गावच्या 34 वर्षीय सूनबाईने चक्क गोल्ड मेडलसह 2 सिल्वर मेडल जिंकले आहे. शूटींग क्रिडा प्रकारात काले येथील शीतल प्रीतम देसाई यांनी तीन पदके जिंकली आहेत. आता त्याचे लक्ष्य हे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातून जवळपास 10 हजार 456 खेळाडूंनी … Read more

चोरीला गेलेले 4 लाखांचे मोबाईल कराड पोलिसांमुळे मूळ मालकांना मिळाले

Karad Police

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामध्ये 2 ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस उन्नत दिन सप्ताहात विविध कार्यक्रमाचे परिणामकारक व व्यापक स्वरूपात आयोजन केले जाते. त्या माध्यमातून जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. या अनुषंगाने गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल व … Read more

महाराष्ट्रात भाजपाचा निवडणुकीत धुव्वा उडेल : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा धुव्वा उडेल. अंधेरी निवडणुकीत उभं राहता आले नाही. शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुका घेता येत नाहीत. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका का घेत नाहीत असा सवालही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काॅंग्रेस राज्य उपाध्यक्ष … Read more

कोयना ते कृष्णा पूल दरम्यान 18 कोटीची गॅबियन भिंत पूर्णत्वाकडे : पृथ्वीराज चव्हाण

Gabion Wall Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 18 कोटी रूपये खर्चून पूर संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्याची आज स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिकांसह पाहणी केली. जवळपास 2100 ते 2200 मीटर परिसर कृष्णा व कोयना नदीचा किनाऱ्यावर गॅबियन बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे कराड शहरात पावसाळ्यातील पूर परिस्थिती कमी … Read more