Satara News : ग्राहकाच्या हातातच मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; घटना CCTV मध्ये कैद (Video)

karad mobile blast

कराड प्रतिनिधी । मोबाईलच्या दुकानातच ग्राहकाच्या हातात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील उंडाळे या गावात घडली आहे. दुकानातील CCTV मध्ये हि घटना कैद झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मोबाईल वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर कराडनजीक गोडाऊनला भीषण आग

कराड | पुणे बंगळुरू महामार्गावर कराड नजीक गोटे हद्दीत जुने टायर स्क्रॅप गोडाऊन ला भीषण आग लागली आहे. रात्री 11 च्या सुमारास ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने दाखल झाल्या. अखेर 2 तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी की, , कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत हॉटेल फर्न पासून … Read more

कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली; चेअरमन व सभासदांमध्ये जोरदार खंडाजंगी

Koyna Housing Society meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोयना कॉलनीतील प्रियंका प्ले हाऊस बंद करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला स्थानिक नागरिक व गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी ठाम विरोध केला. सभेस मृत सभासदांच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या गोंधळात सभा रद्द करण्यात आली. यावेळी चेअरमन शिवाजी चव्हाण आणि सभासदांच्या वारसांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. दरम्यान,  मृत … Read more

शेततळ्यात बुडून महिलेसह 2 बालिकेचा मृत्यू; कराड तालुक्यातील दुर्दैवी घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या 3 मुलींचा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे 9 ते 10 जण … Read more

टाळगाव मध्ये दारूविक्री करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात; 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त

sell liquor in Talgaon

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील टाळगाव येथे अवैध दारूविक्री करणारे 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच सदर आरोपींकडून एकुण 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी कराड तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसमध्ये नवचैनत्य!! कराड शहरात जोरदार जल्लोष

karad congress

कराड । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबीज केली आहे. कर्नाटकातील या विजयामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयाचे पडसाद पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड तालुक्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी विजयाचा जल्लोष करण्यात आला. कराड उत्तरचे … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी 9 महिन्यांपूर्वीच सांगितलेली ‘ती’ चूक अखेर ठाकरेंना महागात पडलीच

prithviraj chavan uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर सर्वोच्य न्यायालयाने काल निर्णय जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हंटल. ९ महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको … Read more

महिलांसाठी गुड न्युज! Microwave Oven वर रेसिपी शिकण्याची सुवर्णसंधी, वेळ अन् ठिकाण चेक करा

Microwave Oven learning

कराड : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असून घराघरांत पैपाहूण्यांची वर्दळ वाढली आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुलंही घरी असल्याने महिला वर्ग वेगवेगळ्या रेसिपी करण्यात दंग आहे. अलीकडे अनेक नवीन रेसिपीसाठी मायक्रोवेव ओवन लागतो. परंतू अनेकांना ओवन वापरायचा कसा याबाबत पूरेसी माहिती नसते. म्हणून कराड शहरातील नामांकित पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक शाॅपने खास महिला वर्गासाठी Microwave Oven … Read more

स्वच्छ कराडात मुलांसाठी साकारलीय ‘पुस्तकांची बाग’

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव शाळेतील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, लहानपणापासूनच त्यांना विविध पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी कराडमध्ये पुस्तकांची बाग ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह तथा टाऊनहॉल येथील बागेत ही सुंदर अशी पुस्तकांची बाग साकारण्यात आली आहे. कराड पालिकेच्यावतीने आयोजित या पुस्तकांच्या बागेच्या संकल्पनेच्या माध्यमातून उन्हाळा सुट्टीत … Read more

एका जागेवर बसून कलाटणी घडवण्याची पवारांमध्ये ताकद : श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय हा धक्कादायक आहे. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असणार आहोत. केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय … Read more