कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल … Read more

कोल्हापूरात लॉकडाउनमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या 100 जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्यावतीने संचारबंदी लागू केली असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कोल्हापूर शहरातील 100 जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संचारबंदी काळात घराबाहेर पडणारे उच्चभ्रू लोक असून त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडल्या नंतर खोटी माहिती दिल्याचं देखील उघड झालंय.खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर , वकील … Read more

मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.हा तरुण दिल्ली येथून १४ मार्च रोजी निघाला होता तर १६ मार्चला कोल्हापुरात पोहोचला होता. दरम्यान, येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. … Read more

यंदा घरातूनच जोतीबाच्या नावानं ‘चांगभलं’; डोंगराकडे जाणारे रस्ते ओस

कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दख्खनचा राजा  जोतीबाची यात्रा रद्द करण्यात आलीय. करोनाच्या संकटामुळे जोतिबाची यात्रा रद्द झाल्याने डोंगराकडे जाणारे रस्ते ओस पडले आहेत. डोंगर सुनसान आहे . ठराविक पुजाऱ्यानी आज जोतीबाची अलंकारिक पूजा बांधलीय. लाखो भाविकांच्या उपस्थियीत संपन्न होणारी यात्रा कोरोनाच्या संकटामुळं मात्र १२१ वर्षानंतर रद्द झालीय. दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह … Read more

१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

द ग्रेट कोल्हापूरकर! सफाई कर्मचाऱ्याचे पैशाचा हार घालून स्वागत

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर देशावर जीवघेण्या कोरोनाच संकट आहे. अशा नाजूक आणि धोकादायक परिस्तितीत सुद्धा डॉक्टर, पोलीस, इतकेच काय सफाई कर्मचारी जीव मुठीत धरून तुमच्या-आमच्यासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळं लोकडाऊनच्या काळात शहराची स्वछता आपल्या खांद्यावर घेणारे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत. अशी कृतज्ञतेची भावना मनात बाळगून आज कोल्हापूरकरांनी कचरा उचलणाऱ्या कामगाराचा हार … Read more

लॉकडाऊनमुळ दूध संघांसमोर अडचणी; लाखो लिटर दूध वितरणाविना शिल्लक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनामुळे संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई पुण्यातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याने पुणे विभागातून संकलित होणाऱ्या २१ लाख लिटर दुधापैकी एक लाख लिटरच्या आसपास दूध शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अनुभव सहकारी दूधसंघांना आला असून भविष्यात खासगी संघांच्या संकलनावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातून गोकुळ, राजारामबापू सहकारी संघ, कात्रज, … Read more

कोरोना जनजागृतीसाठी बेळगावात उभारली मास्क घातलेली गुढी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडव्याचा सण नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा देशभर कोरोनाच संकट घोंगावत असताना देखील हा सण महाराष्ट्र बरोबर कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलाय. यंदाच्या गुढीपाडवा सणाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटकातल्या बेळगाव शहर शहरातील उभारलेली एक आकर्षक गुढी. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे. गुढी … Read more

अंबाबाई मंदिरात यंदा गुढीपाडवा भाविकांविनाच

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज गुढीपाडवा साधेपणाने करण्यात आला आठ दिवसांपासून हे मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील श्री पूजकानी आज मुख्य गर्भगृहाजवळ कुंकुमार्चन करत कोरोनाचे संकट दूर होऊ देत असं साकडं आंबा मातेला घातलं कोल्हापुर मधल्या अंबाबाई … Read more

कोल्हापूरात चारित्र्य पडताळणीसाठी आता डिजिटल साईन सुविधा उपलब्ध

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दिनांक 15 मार्च पासून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी डिजिटल साईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रमाणपत्राची प्रिंट काढण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने Pcs.mahaonline.gov.in शासकीय संकेतस्थळावर ऑनलाईन व्हेरिफीकेशन (चारीत्र्य पडताळणी /वर्तणुक दाखला ) ची सुविधा सन 2016 पासून सुरु केली आहे. … Read more