रणवीर चव्हाण यांच्या रूपाने केडीसीसी बँकेने एक प्रामाणिक मोहरा गमावला- मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक रणवीर उदाजीराव चव्हाण यांचा मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अधिवेशनानिमित्त मुंबईत असलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील घटनास्थळासह खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन चव्हाण यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच वाशी येथील … Read more

कोल्हापूरात लोकशाही दिनाला प्रचंड प्रतिसाद; सामान्यांची अनेक कामे मार्गी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या लोकशाही दिनातून आपले प्रश्न सोडवून घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबर त्यांच्या निराकरणासंबंधिचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले. गावा-गावातून आलेल्या नागरिकांच्या प्रश्न आणि … Read more

आजरा नजीक डोंगरावर वनवा पेटला; आगीत वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात सद्या आगीच्या घटना वाढत आहेत. आजरा उत्तूर मार्गावरील भादवण तिटा ते मासेवाडी दरम्यानच्या खाजगी क्षेत्राला अचानक आग लागली आगीमध्ये वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग काल सायंकाळीच्या सुमारास लागली असल्याचं सांगितलं जात आहे. या आगीने उग्र रुप धारण केल्याने येथून ये-जा करणारे प्रवाशासह स्थनिकांना … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटीचा निधी देणार- उदय सामंत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात आज मंत्री श्री.सामंत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी … Read more

सीमा भागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करणार; उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांनी केली घोषणा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात महाराष्ट्राच्या भूभागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. सामंत हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेत असताना विद्यापीठाला … Read more

कोल्हापूरात अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसरात घडला आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना काही लोकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. या संबंधित … Read more

५ दिवसांचा आठवडा: सुट्टीच्या मोबदल्यात कामाची हमी देत सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ५ दिवसांच्या आठवड्याची मागणी शासनाने मान्य केली, त्यामुळं सुट्टीच्या मोबदल्यात सरकारी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी कामाची हमी दिली असून जनतेला दिलेल्या वचनाचे पावित्र्य जपण्यासाठी आज सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून वचनबध्दतेची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात या शपथ कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ … Read more

अखेर अंनिसच्या प्रखर विरोधामुळं इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कडून शिवमहोत्सव २०२० या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात इंदूरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु कोल्हापूरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी केलेल्या विरोधामुळे इंदुरीकर महाराजांचे शिवाजी विद्यापीठातील कीर्तन रद्द करण्यात आलं आहे. मात्र शिव महोत्सव ठरल्याप्रमाणे होणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी … Read more

त्याग-सदभावाचे कार्य समाजाला प्रेरक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर त्याग, सदभाव, साधना हा मानवी जीवनाचा ठेवा असून त्याग आणि सदभावाचे साधु-संतांचे कार्य समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने येथील भक्तीपूजानगरमध्ये तेरापंथ समुदायाचे 11 वे अधिशास्ता आचार्य महाश्रमण यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन सोहळयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी … Read more

भर कार्यक्रमात जेव्हा राज्यपाल मांडी घालून खाली बसतात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्यश्री महाश्रमन यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. आचार्यश्री महाश्रमन यांची देशव्यापी यात्रा सुरू आहे. तीन देश आणि 20 राज्यांमधून पदयात्रा करत ही यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली. आचार्यश्री महाश्रमन यांच्या राज्यस्तरीय अभिनंदनाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. … Read more