सांगली फाट्यानजीक साडेदहा लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कोल्हापूर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे काल रात्री उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने लावलेल्या सापळ्यात 10 लाख 52 हजार 840 रुपयांचे गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोपाळ नामदेव सावंत, (रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) फिरोज अहमद शेख (रा. निमसालेवाडा, सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्गावरुन बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असल्याची … Read more

लोकशाही पंधरवडा अंतर्गत शहरात रॅलीद्वारे मतदान जनजागृती

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – महानगरपालिकेत लोकशाही पंधरवडा दि.26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. निवडणूकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी शहरात रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येत असनू या अंतर्गत आज गांधी मैदान येथून मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. … Read more

हातकणंगले तालुक्यातील माणेवाडी गावामध्ये 35 लोकांना जेवणातून विष बाधा

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : माणेवाडी या गावामध्ये मयत दत्तात्रय नारायण पाटील यांच्या उतरकार्य होते. भावकीतून रात्री जेवण आणून जेवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आज पहाटे 5 वाजल्या पासून 24 स्त्री ,9 पुरुष व एक लहान 8 वर्षाचा मुलगा अशा 35 लोकांना संडास ,उलटी, पोटात दुखणे असा त्रास चालू झाल्यामुळे या सर्व रुग्णांना जवळच्या पारगाव ग्रामीण रुग्णालयात … Read more

भर सभागृहात उतू गेलं प्रेम, नगरसेवकाने घेतलं नगरसेवकाचे चुंबन; अनेकजण पाहतच राहिले,पहा व्हिडीओ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महानगरपालिकेच्या सभागृहात शाब्दिक भांडणं, मारामाऱ्या झालेल्या तुम्ही पहायल्या असतील पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात एक अजबच प्रकार घडला आहे. ताराराणी आघाडीचे नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकाची भर सभागृहात चुंबन घेतले आणि सभागृहातील प्रत्येकजण पाहतच राहिला. महानगरपालिकेची सभा सुरु असताना हा प्रकार घडला. विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची चुंबन घेतल्याने सर्वजण अवाक् झाले. … Read more

कोल्हापूरात पैशाच्या हव्यासापोटी मद्यपीचा खून

पैशाची गरज असल्याने टेंबलाई नाका येथील सैन्यदलाच्या जागेत झुडपात झोपलेल्या मद्यपी बंडी नागार्जुन (वय ३०, रा.वेलदूर, जिल्हा मेहबूबनगर, आंध्रप्रदेश) याच्या डोक्यात काठीचे फटके मारुन खून केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित अमीर दिलावर तहसिलदार (वय २६, रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) याला रात्री राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूरात म्हशीला कुत्रा चावल्यानं, रेबिजच्या धास्तीनं नागरिकांनी घेतली रुग्णालयात धाव

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील शिये येथे एक म्हैस पिसाळलेल कुत्रा चावल्यानं चार दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडली होती. वैद्यकीय अहवालातून त्या म्हैशीला रेबीज झाल्याचे समोर येताच, शिये गावातील ग्रामस्थांची घाबरगुंडीच उडाली. या म्हैशीचे दूध ज्यांनी घरी वापरले होते त्या शेकडो ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.

कोल्हापूरात खासगी सावकारांच्या घरी छापे; १२ आधिकारी ६३ कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पोलीस विभागाचे १२ अधिकारी आणि ६३ कर्मचाऱ्यांच्या पथकाने अवैध सावकारीवर सात ठिकाणी आज छापे घातले. खरेदी खत, कच्च्या नोंदीच्या वह्या, डायऱ्या, कोरे व लिखित धनादेश, संचकार पत्रे, कोरे व हस्तलिखित बाँड अशी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली.

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कोल्हापूर येथील किनीटोलनाका येथे आज गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. कोल्हापूर पोलीस आणि राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक असलेले तीन आरोपी यांच्यात फायरींग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे किनीटोलनाका आणि परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील २५ गुन्ह्यांत आवश्यक … Read more

सरसकट कर्जमाफीसाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात काढला हजारो शेतकऱ्यांसोबत धडक मोर्चा

राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.