Saturday, March 25, 2023

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक शुल्कासाठी अभियंत्याकडून 30 हजारांची मदत

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
वडिलांकडून मिळालेला दातृत्वाचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा महावितरणच्या कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांनी पुढे चालू ठेवली आहे. मंगळवारी (दि. 4) त्यांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यातील 5 शालेय विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 6 हजार प्रमाणे 30 हजार रुपये शालेय शैक्षणिक शुल्क भरले आहे.

राजेंद्र हजारे यांचे वडील कै. लक्ष्मण राऊ हजारे शिक्षक होते. त्यांच्या हयातीत त्यांनी दिनदलितांची मदत केली. त्यामुळे त्यांचा राष्ट्रपती पुरस्काराने व ‘दलित मित्र’ पुरस्काराने गौरव झाला होता. त्यांचा हा वारसा श्री. हजारे यांनी पुढे चालविला आहे. आतापर्यंत त्यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या चार गरजू गुणवंत मुलांचे अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील ‘हॅप्पी इंग्लिश स्कूल’ शाळेतील पाच मुलांच्या यंदाच्या वर्षाचे प्रत्येकी सहा हजार रुपये प्रमाणे तीस हजार रुपयांचे शुल्क भरले आहे.

- Advertisement -

महावितरण कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याहस्ते शाळेचे संचालक मकरंद देशपांडे यांचेकडे रोख स्वरुपात शुल्काची रक्कम सुपूर्द केली. यावेळी अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे, नरेंद्र ताडे व सागर मारुलकर, ग्राहक मंचाचे सदस्य प्रशांत पुजारी आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.