‘त्या’ १७ वर्षीय मुलीची आत्महत्याच! पोलीस तपासात खुलासा

कोल्हापूर जिल्हयातील कसबा तारळे येथील एका १७ वर्षीय कॉलेज युवतीचा मृतदेह मंदीरात घंटेला बांधलेल्या आढळून आला होता. एक तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस चौकशीत मृतक तरुणीचे कौसर नासिर नायकवडी असं असल्याचे कळाले होते. या तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला होता त्यानुसार प्रथमदर्शी या तरुणीने स्वतः गळफास लावून घेतल्याची शक्यता वर्तवली जात होती.

अवैध गाैणखनिज उत्खन करणारांना तहासिलदारांचा दणका; २१ जेसीबी, ७ ट्रॅक्टर, ४ डंपर जप्त

नेहमीप्रमाणे टाेप येथील खाण व्यवसाय सुरू हाेते. मात्र आज अचानक झालेल्या या कारवाईने एकच गाेंधळ उडाला. तहसीलदार कार्यालयाकडे अवैध उत्खनना बाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या या तक्रारीमुळे ही  कारवाई करत असल्याचे तहसिलदार उबाळे यांनी सांगितले.

रस्ता दुरुस्तीच्या कामांची ऋतुराज पाटील यांच्याकडून पाहणी

फुुलेवाडी रिंगरोड ते कळंबा साईमंदिर रिंगरोडवर नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी गुरुवारी आमदार ऋतुराज पाटील व स्थायी समिती सभापती शांरगधर देशमुख यांनी संबधीत अधिकाऱ्यांसमवेत केली. सदरची फिरती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आयोजीत केली होती.

अखेर छत्रपती शिवाजी मार्केटमधील लिफ्ट सुरु! महापौर, उपमहापौर यांनी केले उदघाटन

महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ शिवाजी मार्केट येथील लिफ्ट गेले वर्ष भरापासून बंद होती. मात्र सदरची लिफ्ट गुरुवार पासून सुरु करण्यात आली. या नुतनीकरण करण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन आज महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलताना ”या लिफ्टचे नुतनीकरण केल्यामुळे वयस्कर नागरिक, कर्मचारी यांना कार्यालयीन कामाकरीता चौथ्या मजल्यापर्यंत जाण्यास मदत होणार आहे. मागील एक वर्षा पासूनचा होत असलेला त्यांना त्रास हा कमी होण्यास मदत होणार आहे” असे सांगितले.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच उल्लेख हवा; छत्रपती संभाजींची मागणी

काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी जाब विचारला जात होता. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

साखर आयुक्तांचा ७ साखर कारखान्यांना दणका ! ‘एफआरपी’ची रक्कम न भरल्याने परवाने रोखले

शासकीय भागभांडवला सह शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे. यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.

कोल्हापूरात ऊस दरावरून संघर्षाची ठिणगी !

कोल्हापुरात ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. ‘एफआरपी’ चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

‘आघाडी’चा एकही आमदार फुटणारचं नाही – सतेज पाटील

सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना काँग्रेसचे आमदार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरच्या काँग्रेस कमिटीत येऊन मतदार संघाचा आढावा आणि इतर कामकाजाला सुरवात केली आहे. राज्यातील चालू राजकीय घडामोडीवर सुद्धा कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून जयपूर, मुंबई दौऱ्यानंतर आता काँग्रेस आमदारांची कोल्हापूरात चर्चा सुरू झाली आहे.