भाजपकडून सावरकरांचा कामापुरताच वापर – शिवसेनेचा सामनामधून भाजपाला टोला

भाजपकडून सावरकरांचा कामापुरताच वापर होत आहे. असा टोला शिवसेनेनं सामनामधून भाजपाला लगावला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० तर भीमा कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे

मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आलेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सावरकरांना अभिवादन करणाऱ्या ‘त्या’ ट्विटने राज ठाकरे नेटकऱ्यांच्या कचाट्यात

क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज्ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

अमरावतीमधील ‘पोकरा’ तील कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथे भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) कामांची पाहणी केली. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

अज्ञात व्यक्तीने शेततळयात विषारी औषध टाकल्यामुळे मासे मृत्युमुखी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेततळयातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमरावती जिल्ह्यात 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान

जिल्ह्यातील एकूण 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.

बदली करुन देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना औरंगाबादेत लिपिकाला अटक

बदलीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करुन देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून २५ हजार रुपये लाच घेताना मृदा व जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

अचानक लागलेल्या आगीत मुलाचा गुदमरून मृत्यू ; तिघांची प्रकृती चिंताजनक

इमारतीच्या खालच्या मजल्याला आग लागली. त्यामुळे घराबाहेर निघता न आल्याने धुरामुळे गुदमरून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे.

आपल्या मराठीला नक्की झालंय काय ? मराठीची वाट लावणाऱ्या मराठी बांधवांना अनोख्या शुभेच्छा..!!

मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा…

लग्नाच्या आधी आत्महत्या ?? पण का?

लग्नाच्या 15 दिवस आधी आत्महत्या करावी असं कोणाला वाटेल बरं ? कोणालाच नाही वाटणार. मग औरंगाबादमधील एम.डी झालेल्या डॉक्टर तरुणीला असं का वाटलं असावं ? तिचं प्रेमप्रकरण होतं का? तिला कशाचा त्रास होता का?