राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारचं एकमत

मुंबई । कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे समजत आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यावर ठाकरे सरकारचे एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यावर या बैठकीत सहमती झाली आहे. … Read more

लॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा?

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू असल्यामुळं जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांच्या कामकाजांवर निर्बंध आले आहेत. सरकारी काम ठप्प पडू नये म्हणून खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा केंद्रानं दिली होती. दरम्यान, आता केंद्र सरकार पुढील काळासाठीही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्याचा विचार करीत आहे. याबाबत नव्या नियमावलीचा मसुदाही … Read more

लॉकडाउनमध्ये ट्रेन तिकीट बुक करताना रेल्वे मागणार ‘ही’ माहिती

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये थोडा बदल केला आहे. जर तुम्ही लॉकडाउनदरम्यान विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. जर भविष्यात गरज पडली … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित … Read more

कोरोना HIV सारखा कधीच नष्ट होणार नाही, WHOची चेतावनी

वृत्तसंस्था । संपूर्ण जग कोरोना व्हायरसने ग्रासलं आहे. जगभरात लॉकडाऊनमुळं लोक घरात कोंडून आहे, उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा अजूनही शोध लागलेला नाही. अशा बिकट परिस्थितीतून जात असताना जीवघेणा कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. … Read more

मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर; रस्त्यावर लोकांची तुडुंब गर्दी

सागर, मध्यप्रदेश । देशभरात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं आहे. त्यामुळं गेले दीड महिन्यापेक्षा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. याकाळात कुठल्याही सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सवानिमित्त एकत्र येण्याला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या काळात घातलेले निर्बंध धाब्यावर बसवून धार्मिक कारणांवरून लोक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करून … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत देणार सात विशेष विमान उड्डाणांना परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासांवर निर्बंध घातल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी २१ मेपासून भारतातून सात खास उड्डाणे आयोजित केली जाणार आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत एअर इंडियाची काही विशेष उड्डाणे भारतीयांना परत आणण्यासाठी घेण्यात येतील, अशी माहिती या अधिकृत अधिसूचनेत उच्चायोगाने … Read more

निर्मला सीतारामन यांनी उद्योगांसाठी सांगितलेल्या सहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या??

टीम हॅलो महाराष्ट्र | निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठीच्या उद्योगविषयक धोरणांकडे लक्ष देत सहा महत्वाच्या गोष्टींविषयी आज भाष्य केलं. १) मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं. २) सरकारतर्फे २० हजार … Read more

सोशल मीडियावर अमेरिकेतील ‘हा’ एका वर्षाचा ‘लिटिल शेफ’ का प्रसिद्ध होतो आहे, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवताना दिसत आहे. यापैकीच एका छोट्या शेफची छायाचित्रेही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एक वर्षाचा असलेला लिटिल शेफ कोबेने आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओंद्वारे इंस्टाग्रामवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो सोशल साइटवर लोकांना किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नवीन टिप्स … Read more