मुंबईकरांना दिलासा..!! महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवासास परवानगी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातील संचारबंदीचे शिथिल केलेले नियम केंद्र सरकारने ३१ मे रोजी जाहीर केले होते. व राज्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य दिले होते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्य सरकारने हे नियम आज (गुरुवारी) जाहीर केले आहेत. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील आर्थिक घडामोडीही सुरु करण्याच्या दृष्टीने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महानगर पालिकेच्या … Read more

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तरी कंपन्यांची पगार कपात सुरूच

नवी दिल्ली । देश अनलॉक होण्याची सुरूवात झाली असली तरी अद्याप अनेक कंपन्या पगार कपात करतच आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या हवाई वाहतूक सेवेतील सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगार कपात केली होती. एअर एशिया इंडियाने मे आणि जून महिन्याच्या वेतनात सरासरी ४० टक्के कपात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा फटका आणखी काही काळ बसणार … Read more

Swiggy आता ‘या’ राज्यातही करणार दारुची ‘होम डिलिव्हरी’

नवी दिल्ली । लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने झारखंड आणि ओडिशानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मद्याची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरू होत असून लवकरच राज्यातील अन्य शहरांमध्येही घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुकानांवरील गर्दी कमी … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

आता खासगी कार्यालयेही सुरु होणार; राज्य सरकारने दिली परवानगी

मुंबई । लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास आता सुरुवात करण्यात आली असून राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशात खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी याच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. ८ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. या आदेशानुसार … Read more

मोदी सरकारनं लागू केलेला लॉकडाऊन फोल ठरला- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन वाया गेला असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, … Read more

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि … Read more

कठोर लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान झालं- राजीव बजाज

नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीडीपी वृद्धीचा आलेख आता उतरू लागला आहे. कठोर लॉकडाउनमुळे आता केवळ नुकसान होणार आहे, अशा शब्दांत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बजाज यांच्याशी कोरोना संकटावर ऑनलाइन चर्चा केली. त्यावेळी बजाज यांनी आपली मते … Read more

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असेल? पहा काय म्हणतायत छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी शिवराज्याभिषेक आहे. २००७ पासून रायगडावर शिराज्याभिषेक हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मात्र यंदा दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कशा पद्धतीने साजरा होणार असा … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more