…तर विधानसभेचा उमेदवारी अर्जसुध्दा भरणार नाही- अनिल बाबर

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे ‘मी येतोय असे काही जण म्हणत आहेत. परंतु कुणाला यायला आमची बंदी नाही. बंदी तर तुमच्याकडे आहे. आमदारांनी विट्यासाठी काय दिले ? असा प्रश्न विचारता. पण तुम्ही पण दोनवेळा आमदार होता. तुम्ही तर कायद्याचे पदवीधर आहात पालिका अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. विधानसभेच्या प्रोसेडिंगमधून माहिती घ्या. विट्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी माझे योगदान … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

आता विधानसभा निवडणूकाही होणार ‘इको फ्रेंडली’ – जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर प्रतिनिधी। सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने संपूर्ण जग त्रासलेले असताना राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका देखील पर्यावरण पूरक होण्यासाठी निवडणूक आयोगाने सकारात्मक पाऊल उचलले आहेत. लातूर शहरामध्ये याची सुरुवात होणार आहे. ‘विधानसभेच्या उमेदवाराने प्रचारा दरम्यान हारतुऱ्यां ऐवजी झाडे भेट दिल्यास उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सवलत देण्यात आली असून एका झाडाला केवळ एक रुपया खर्च गृहीत धरला जाणार … Read more

अकोले मध्ये भाजपला मोठा धक्का

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आज अजित पवार यांच्या सभेमध्ये आणि उपस्थितीत अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान मधुकर पिचड यांच्या विरोधात ‘एकास एक लढत’ देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली असून लहामटे आणि … Read more

‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत

रत्नागिरी प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होऊ शकतो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आज ‘नाणार रिफायनरी प्रकल्प’ विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा  झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची उपस्थिती या सभेला उपस्थिती होती. यावेळी ‘आमचं नातं लाल मातीशी, मग आम्हाला रिफायनरी नको,  दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री … Read more

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

 माजी आ.परिचारक निवडणूक लढणार ?

सोलापूर प्रतिनिधी। माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिलेआहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार पडली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी  सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी. असा सर्वानुमते ठराव नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिला. सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचे सलग 20 … Read more

‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये धुसफूस

सांगली प्रतिनिधी। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून गौरव नायकवडी तर शिवसेनेतून आनंदराव पवार या दोन नावावर वाळवा तालुका समन्वय समितीचे एकमत झाले आहे. या दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जो उमेदवार ठरवतील त्याचे प्रामाणिकपणे काम करू. आत-बाहेर करणार नसल्याची ग्वाही … Read more