मराठी बिग बॉस विजेता विशाल निकमचे देविखिंडीत जल्लोषात स्वागत

सांगली । बहुचर्चित ठरलेल्या बॉस मराठीला अखेर तिसर्‍या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकम ’बिग बॉस मराठी’च्या तिसर्‍या पर्वाचा विजेता ठरला आहे. कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्‍या खानापूर तालुक्यातील देविखिंडी गावची ओळख विशाल निकमच्या या यशामुळे आता सातासमुद्रापार गेले आहे. विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा विजेता ठरल्याचे जाहीर होताच त्याच्या चाहत्यांनी … Read more

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘अगंबाई सासूबाई’ ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या … Read more

मऱ्हाटमोळ्या दिग्दर्शक सुरज मधाळेची ‘वावटळ’ झळकतेय सातासमुद्रापल्याड..!!

रुपेरी दुनियेतून | अमेरिका येथे होणाऱ्या सिल्व्हर आय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (SILVEREYE INTERNATIONAL FILM FESTIVAL) मऱ्हाटमोळ्या सुरज मधाळेची ‘वावटळ’ ही शॉर्टफिल्म प्रदर्शित होत आहे. कोंडगावचा सुरज मधाळे हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, (FTII) पुणेचा माजी विद्यार्थी असून या आधी त्याची ही शॉर्टफिल्म कल्पनिर्झर आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आली होती. या महोत्सवात ‘वावटळ’ला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं. … Read more

ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना देखील या आजाराला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील एक महत्वाचे नाव म्हणजे मिलिंद इंगळे होय. मिलिंद इंगळे यांना मी महिन्यात कोरोनाचे निदान झाले होते. आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण … Read more

आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

बहुप्रतिक्षित ‘म्होरक्या’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पहा फक्त एका क्लिकवर..!!

बहुप्रतिक्षित म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी संध्याकाळी रिलीज करण्यात आला आहे.

बहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित

पुणे | महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी – saffron हा आगामी मराठी चित्रपट एका कुस्तीपटूच्या संघर्षाभोवती फिरणारा असून चित्रपटाचा रंगतदार टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत केसरी – saffron या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी … Read more

आर्चीचा नवा ‘मेकअप’ टीझर प्रदर्शित !

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. आता रिंकूचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

Ramesh Bhatakar

हॅलो महाराष्ट्र टीम | मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (वय ७०) यांचे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबईत निधन झाले. भाटकर यांनी मुंबईच्या एलिझाबेथ रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाटकर हे मागील एका वर्षापासून कॅन्सरशी लढा देत होते. विशेष म्हणजे आज कर्करोग दिनी (४फेब्रुवारी) भाटकर यांना … Read more

नागराजच्या ‘नाळ’ची विक्रमी कमाई, पहिल्याच आठवड्यात १४ कोटींचा गल्ला!

Naal Movie

मुंबई | आई आणि मुलाच्या अतुट नात्यावर भाष्य करणारा ‘नाळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात ‘नाळ’ने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल १४ कोटींची विक्रमी कमाई केली. ‘सैराट’ पाठोपाठ पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘नाळ’ने मान पटकावला आहे. नागराज … Read more