मराठवाड्याला शासनाकडून १,७९१ कोटींचे अनुदान;अवकाळी नुकसान मदत

यंदाच्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. त्या नुसार मराठवाड्याला राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा पहिला हप्ता म्हणजेच ८१९ कोटी मिळाले होते. पहिला हप्ता देण्याची तरतूद केल्यानंतर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील १७९१ कोटी रुपयांचे अनुदान विभागाला देऊ केले आहे.१३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला २९०४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा अहवाल दिला होता. त्यात पुन्हा ४५० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. ३३५० कोटींपैकी आजवर २६८२ कोटी विभागाला अनुदान प्राप्त झाले आहे.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील हे ‘रझाकाराची औलाद’- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. त्या अनुषंगाने औरंगाबादेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे एमआयएम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे अनुपस्थित होते. यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या अनुपस्थितीवर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली.  खैरेंना खा.इम्तियाज जलील यांच्या अनुपस्थिती … Read more

मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी मोदींनी केली ही मोठी घोषणा

औरंगाबाद प्रतिनिधी | मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाण्याचे हे संकट दूर सारण्यासाठी येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या जलजीवन मिशन योजना राबवून या योजनेवर खर्च केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबादेत केली. मोदी हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या ऑरिक सिटी उद्घाटन आणि महिला मेळाव्यासाठी आले असताना आयोजित कार्यक्रमात बोलत होते. … Read more

जिग्नेश मेवानी यांनी महाराष्ट्रातही स्थापना केला ‘दलित अधिकार मंच’

टीम, HELLO महाराष्ट्र | गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी महाराष्ट्रातही त्यांच्या दलित अधिकार मंचची स्थापना केली आहे. भाजपाला सत्तेतून हटविण्यासाठी त्यांनी सर्वच विरोधी पक्ष-संघटनांना एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात जिग्नेश मेवानी सभा आणि शक्ती प्रदर्शन करीत आहेत. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरपासून दलित अधिकार मंचाची राज्यात स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित … Read more

हुंडा दिला नाही म्हणुन पती म्हणाला तलाक तलाक तलाक!! पत्नीनं केलं असं काही

औरंगाबाद प्रतिनिधी | केंद्र शासनाने तीन तलाख प्रथे विरोधी कायदा मंजूर केल्यानंतर शहरात प्रथमच तर राज्यात दुसरा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या पूर्वी ठाणे शहरात एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलीय. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन वेळा तलाख म्हणून निघून गेल्याची तक्रार जिन्सी … Read more

मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे … Read more

हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू

Hingoli Road Accident

हिंगोली | सतिश शिंदे कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजेताच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ च्या सुमारास भरधाव ट्रकने … Read more

मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध- मुख्यमंत्री फडणवीस

मुक्तिसंग्राम दिन

औरंगाबाद | अमित येवले मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मराठवा़डा मुक्तीसंग्राम दिना निमित्त औरंगाबाद येथे ध्वजारोहण आणि ‘अग्रेसर मराठवाडा ‘ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील ४ वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी … Read more