तमाम मराठी जनांना ‘पानिपत’ सिनेमा पाहण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन

मोठी उत्सुकता लागून असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ६ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या लढाई वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अर्जुन कपूर , क्रिती सेनॉन , संजय दत्त या तगड्या कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सध्या सर्व स्तरातून चित्रपटाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे आणि हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

अगं अगं म्हशी, खड्डे सांभाळून जाशी..!!

कोल्हापुरात रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. या प्रश्नासाठी वारंवार मागणी करण्यात आली. तसेच वेळोवेळी यासाठी निदर्शनेदेखील करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून अदयाप हि ठोस पाऊले उचलले जात नाहीत. रस्त्यांच्या याच प्रश्नावरून आता ‘मनसे’  आक्रमक झाली आहे.

राज ठाकरेंनी केली लता दीदींच्या आरोग्यांसाठी विशेष प्रार्थना

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी केले आवाहन; हा चित्रपट आवर्जून बघाच

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटर वरुन पुढील महिन्यात रिलीज होणारा चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे. राज आवाहन करतांना म्हणतात, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण … Read more

मनसेचे सर्व उमेदवार आज कृष्णकुंजवर; पराभवाचे करणार मंथन

विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे महायूतीला जोरदार यश मिळाले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे लढवलेल्या सर्व उमेदवारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली आहे. आज राज ठाकरे सर्व उमेदवारांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत. राज्याच्या निवडणुकांमध्ये मनसे सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.

‘मनसे’ने भोपळा फोडला!! कल्याण मधून राजू पाटील विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना ८६,२२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना ८०,६६५ मते मिळाली आहेत.

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.