राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे. एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच … Read more

पावसाळ्या मध्ये मुंबईत कोरोना आणखी थैमान घालणार; आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल

मुंबई । मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यादरम्यान आणखी एक चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढेल त्यामुळं मुंबईत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं आयआयटी मुंबईने आपल्या अभ्यासात म्हटलं … Read more

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना १ कोटीचे विमा कवच द्यावे; महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे राज्यपालांना पत्र

मुंबई । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला होता. मात्र राज्याचे राज्यपाल भारतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयावर आक्षेप घेत परीक्षा घेण्यास सांगितले आहे. यावर आता महाराष्ट्र पदवीधर संघटनेने राज्यपालांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. अंतिम … Read more

कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात … Read more

मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये … Read more

आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. … Read more

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, … Read more

लोकल ट्रेन सुरु करा! जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं मागणी

मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार … Read more

सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने … Read more

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस … Read more