अतिवृष्टीचा रेड अलर्ट ; या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई प्रतिनिधी | हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा आलेला ऑरेंज अलर्ट आता रेड अलर्ट मध्ये बदलला आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सकाळच्या सत्रात शाळेत असलेल्या मुलांना सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांना देण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग … Read more

शिवसेना प्रामुख्यांवर होणार वार स्वतःच्या अंगावर झेलणारा बाळासाहेबांचा निकटचा सहकारी हरपला

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे रविवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर एक महिन्यांपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने रविवारी सायंकाळी निधन झाले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले भालचंद्र ठाकूर यांना भाऊदादा म्हणून … Read more

आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा लढणार ; शिवसेनेच्या या नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये केली घोषणा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षाचे प्रमुख असणारे ठाकरे कुटूंब निवडणुक लढण्यापासून दूर का राहते असा प्रश्न नेहमीच राजकरणात विचारला जातो. त्या प्रश्नाचे उत्तर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देणार आहे. कारण आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहे आता निश्चितच मानले आहे. या संदर्भात वरळी येथील शिसैनिकांच्या मेळाव्यात घोषणा देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाला उद्धव ठाकरेंचा ग्रीन सिंग्नल

मुंबई प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा केली आहे. सुनील तटकरे म्हणजे त्यांच्या चुलत्या सोबत त्यांची तेढ निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटली आणि शिवसेना प्रवेशाचा मनसुबा बोलून दाखवला. त्याला उद्धव ठाकरेंनी दुजोरा … Read more

राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे.आपण शिवसेनेत जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. त्याप्रसंगी त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केले आहे. शिवसेना प्रवेशाचं ठरलं ! सोपलांचा निर्धार ; शिवसेनेत जावून व्हायचे आमदार शरद पवार यांच्या सोबत मी अनेक वर्ष काम केले असल्याने त्यांच्या बद्दल माझ्या … Read more

राष्ट्रवादीचा हा माजी प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील गटबाजी, अंतर्गत कलह याचा शुकशुकाट लोकसभा निवडणुकीतच लागला होता. मात्र, आजचे राष्ट्रवादी पक्षाचे चित्र पाहता तो एवढ्या टोकाच्या निर्णयांपर्यत पोहचेल याची कोणाला कल्पनाही केली नसावी. राज्यात कॉंग्रेस पुरती गळाली आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा ध्यास घेतला आहे. एकापोठोपाठ एक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडत आहेत. पक्षातील मोठ्या नेतृत्वाचे … Read more

बाबसाहेब आणि संघ प्रमुखांचे विचार सारखेच : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी ‘आरक्षण दिले जावे, मात्र त्याचा आढावा ठराविक कालावधीनंतर घेतला जावा, असे मत मांडले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय … Read more

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. ते राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत असे बोलले जाते आहे. छगन भुजबळ शिवसेनेत गेल्यास त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल हे मात्र त्रिकाल बाधित सत्य आहे. विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका छगन … Read more

विजय शिवतारे आहेत आयसीयूमध्ये ; पुढील १० दिवस रुग्णालयातच ; जारी केला व्हिडीओ

मुंबई प्रतिनिधी | विजय शिवतारे यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नको म्हणून त्यांना डॉक्टरांनी थेट आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे अशी बातमी त्यांच्या मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांना फोन लावण्यास सुरुवात केली. म्हणून विजय शिवतारे यांनी … Read more

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काल दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही असे त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर विजय शिवतारे यांच्या छातीत हृदयविकाराच्या … Read more