मुंबई पूल दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत … Read more

आताही फक्त चर्चाच होणार का ? – नितेश राणेंचं शिवसेनेला सवाल

Untitled design T.

मुंबई  | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर महापालिका आणि इतर राजकीय नेते यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहेत. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता आहे त्यामुळे काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. ‘पेंग्विन … Read more

‘या’ अटीवर मी भाजप प्रवेश करणार – कालिदास कोळंबकर

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणेंसोबतच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोळंबकर सतत सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोळंबकर म्हणाले की, मी इतकी वर्षे आमदार आहे मात्र लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि धुळे या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेचा निवडणुकीसाठी या सभा महत्वपूर्ण ठरणार आहेत. धुळ्यात त्यांची पहिली सभा दुपारी २ वाजता होणार आहे . तर मुंबई मध्ये वांद्रे येथील एमएमआरडी च्या मैदानावर ५ वाजता आयोजित करण्यात … Read more

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु

Untitled design

मुंबई | आजपासून विधिमंडळाचे सहा दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाची सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. अधिवेशनात राज्याचा अंतिरम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयॊग करण्याची शक्यता असून राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणा केली जाईल, अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा … Read more

शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या सभेला नकार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या १ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या सभेला शिवाजीपार्क मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला, त्यामुळे आता ही सभा एमएमआरडीए मैदानावर होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कडून सांगण्यात आले आहे. शिवसेना, मनसे आणि भाजप यांना मैदान मिळते मात्र काँग्रेसला दिले जात नाही असा आरोप काँग्रेस … Read more

पुन्हा एकदा लाल वादळ धडकणार मुंबईत – किसान सभेचा इशारा

Farmers Long March

नाशिक प्रतिनिधी | किसान सभेच्या वतीने वर्षभरापूर्वी नाशिक ते मुंबई भव्य किसान लाँग मार्च काढण्यात आला होता. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या विश्वासघाता विरोधात पुन्हा एकदा हे लाल वादळ मुंबईत धडकणार असल्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने जाहीर केला आहे. नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात

Arun Patil Car

मुंबई प्रतिनिधी | अतिशय आकर्षक दिसणारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक असलेली ‘कॅडिलॅक‘ ही जगातील सर्वांत महागडी मोटार एका मराठी माणसाने विकत घेतली आहे. भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती अरुण पाटील यांनी ही गाडी घेतली असून कॅडिलॅक गाडी असणारे ते भारतातील पहीले आहेत. ‘कॅडिलॅक’ गाडीची किंमत साडे पाच कोटी इतकी आहे. ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीन … Read more

हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??

WhatsApp Image at .. PM

मुंबई | प्रतिनिधी “कॉफी विथ करण” या कार्यक्रमातील महिलांविषयीची आक्षेपार्ह टिप्पणी हार्दीक पांड्याला चांगलीच महागात पडली आहे. हार्दिक घरी आल्यापासून एकलकोंडा झाला आहे. त्याला घराबाहेर पडणं सुद्धा नको झालं आहे. विचार करण्यासाठी मला वेळ द्या असं त्याचं मत असल्याचं त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. सध्या हार्दिक अनुभवत असलेला काळ मॅच फिक्सिंगमध्ये बंदी घातलेल्या खेळाडूंपेक्षा भयानक … Read more

मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव

Mumbai

मुंबई | देशात नामांतराचे वारे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रातही अनेक शहरांची नावे नामकरण करण्याच्या प्रस्तावात आहेत. मधल्या काळात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावत ‘महाराज’ या शब्दाचा समावेश केला गेला. तर दादर स्टेशन चं नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करण्याची मागणी भीम आर्मी ने केली होती. त्यात अजून एक‍ रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. ऐतिहासिक मुंबापुरी च्या बॉंम्बेचे … Read more