…म्हणून कोणी ‘ठाकरे’ होत नाही; अमृता फडणवीस

मुंबई | माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली … Read more

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

सत्ताधारी विरोधकांचा कलगीतुरा; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार’; नागपूरमध्ये झळकले बॅनर

देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडत बसलेल्या भाजपचे विदर्भातील नेते पक्ष सोडण्याच्या नादात

नागपूर प्रतिनिधी | भाजप अजिंक्य असल्याच्या सध्या अविर्भावात आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला भुलून विरोधी पक्षातील भल्याभल्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून भाजपमध्ये प्रवेश केला.परंतू असे असले तरी विदर्भातील भाजप नेत्यांना याचीच धास्ती बसलेली दिसत आहे. विदर्भात भाजपमधील इच्छूकांची गर्दी पाहता, उमेदवारीची खात्री नसल्याने ऐनवेळी निराशा नको म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी अन्य पक्षांकडे गळ टाकून ठेवला असल्याची माहिती … Read more

वारं फिरणारं ! काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तगडा उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाच्या लागलेल्या गळतीला उपाय म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यावर आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेचे देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून प्रतिनिधित्व करत आहेत. … Read more