Thursday, March 23, 2023

…म्हणून कोणी ‘ठाकरे’ होत नाही; अमृता फडणवीस

- Advertisement -

मुंबई | माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

आज देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधी यांच्या आडनावावरील टीकेवर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी होय देवेंद्र हे खरे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. महत्वाचे म्हणजे त्यांनी फडणवीस यांना दिलेल्या उत्तरात उद्धव ठाकरे, शिवसेना यांचे अधिकृत ट्विटर हँडलही टॅग केले आहे. या त्यांच्या विधानावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

खरंय देवेंद्रजी, फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. अमृता यांच्या टीकेवर शिवसेना काय प्रतिउत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.